esakal | नांदेड जिल्ह्यात ३० एप्रीलपर्यंत लाॅकडाऊन; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार- डाॅ. विपीन

बोलून बातमी शोधा

file photo

यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तु सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ता. 30 एप्रिल बंद राहतील.

नांदेड जिल्ह्यात ३० एप्रीलपर्यंत लाॅकडाऊन; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार- डाॅ. विपीन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थोपविण्‍यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे यापुर्वी काढलेल्या आदेशात बदल करुन आता जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी राज्य शासनाने ता. 30 एप्रिल अखेरपर्यंत लागू केलेले निर्बंध असतील. या आदेशाची सोमवारी (ता. पाच) एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी केली जाईल. रात्री आठ वाजतापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी तर सकाळी सात ते रात्री आठपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्‍यात आले आहेत. रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तु सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ता. 30 एप्रिल बंद राहतील.

हेही वाचा - एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्य मुके; बोलता येत नाही मात्र त्यांचा संवाद पाहून...

अत्यावश्यक सेवेमधील खालील बाबींचा समावेश असून याच संस्थां असतील सुरु

1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
2) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने.
3) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
4) विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
5) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व सेवा.
6) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा.
7) मालाची / वस्तुंची वाहतुक.
8) शेतीसंबधित सेवा.
9) ई कॉमर्स.
10) मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा.
11)  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा.