लॉकडाउनचा बळी : हाताला काम नसल्याने एकाने घेतला हा निर्णय..

प्रल्हाद कांबळे
Sunday, 12 July 2020

हाताला काम नसलयाने उपासमार आल्याच्या नैराश्‍येतून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिमायतनगर शहरात शनिवारी (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

नांदेड : मागील काही महिण्यापासून सतत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. या काळात हाताला काम नसलयाने उपासमार आल्याच्या नैराश्‍येतून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिमायतनगर शहरात शनिवारी (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध देशभरासह नांदेड जिल्ह्यातही लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनचा फटका सर्वाधीक हातावर पोट असणाऱ्यांना बसला. त्यांच्या हातचा रोजगार गेल्याने अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवहार, दुकाने, कारखाने, उद्योग बंद असल्याने अनेक कुशल कामगारांच्या हाताला काम नाही. काही दिवस पदरमोड करून आपला संसार चालविला. 

हेही वाचा -  कोरोना इफेक्ट : मामामुळे भाच्यावर गंडांतर, लग्न रद्द, व्हावे लागले क्वारंटाईन

हिमायतनगर ठाण्यात नोंद 

मात्र सतत लॉकडउन होत असल्याने या नैराशेतून आपणच या जगाचा निरोप घ्यावा असे निश्‍चित करुन हिमायतनiर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या प्रसाद श्रावण हातमोडे (वय ५०) यांनी गावशेजारी असलेल्या गंगाधर गायके यांच्या शेतात जाऊन शनिवारी (ता. ११) सकाळी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ध्रुपताबाई श्रावण हातमोडे यांच्यामाहितीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. लक्षटवार करत आहेत. 

बळीरामपूर येथे एकाची आमहत्या

नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथील नंदकिशोर पुंडलीक चिते (वय २५) याने कुठल्यातरी कारणावरुन आपल्या राहत्या घरी शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. साहेबराव पुंडलीक चिते यांच्या माहितीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक श्री. कवटेकर करत आहेत. 

येथे क्लिक करा जिल्हावासियांनी संचारबंदी पाळावी : पालकमंत्री अशोक चव्हाण

साप चावल्याने एकाचा मृत्यू 

हदगाव : तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी बालाजी मारोती मिसाळ (वय ४८) हे आपल्या शेतात शनिवारी (ता. ११) काम करण्यासाठी सकाळी गेले होते. शेतात काम करतांना विषारी सापाने चावा घेतला. लगेच त्यांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विनोद दत्तराव मिसाळ यांच्या माहितीवरुन हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार  श्री. सावंत करत आहेत.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdowns death This decision was taken by someone as there was no work at hand nanded news