

Farmers Loan Recovery Dispute Sparks Protest as Shriram Finance Office Is Vandalised by Activists in Loha Maharashtra District
esakal
लोहा : कर्जदार शेतकऱ्यांकडून मायक्रो फायनान्स कंपन्या आणि श्रीराम फायनान्सकडून सक्तीने कर्जवसुली केली जात असल्याच्या आरोपावरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २) सकाळी अकराच्या सुमारास लोहा शहरातील श्रीराम फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.