esakal | खूनी पत्नीसह प्रियकराला कोठडी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या प्रकरणी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी (ता. १५) देगलुर न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायाधीश प्रदीप बारटक्के यांनी दोघांना पाच दिवसाची (ता. २० मेपर्यंत) पोलिस कोठडीत पाठविले आहे.

खूनी पत्नीसह प्रियकराला कोठडी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : तमलूर (ता. देगलूर) येथील एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. घटनास्थळावरील संशयित साहित्यावरून देगलूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर सदरील व्यक्तीचा खून अनैतिक संबधातून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी (ता. १५) देगलुर न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायाधीश प्रदीप बारटक्के यांनी दोघांना पाच दिवसाची (ता. २० मेपर्यंत) पोलिस कोठडीत पाठविले आहे.

तमलूर येथील भीमराव रामा सूर्यवंशी (वय ४०) या व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. हा मृत्यू घात की अपघात? अशा संशयाच्या भोवऱ्यात प्रकरण सापडले होते. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली.

हेही वाचाBig Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह

मंडगी ता. देगलूर येथील घटना

मंडगी येथील नागोराव देवराव लोणे याचे तमलूर येथील भीमराव रामा सूर्यवंशी यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधास पती भीमराव सूर्यवंशी हा अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा डाव दोघांनी रचला. ठरलेल्या कटानुसार सोमवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास नागोराव लोणे याने तमलूर येथून दुचाकीवरून भीमराव सूर्यवंशी यास तमलूर रस्त्यालगत असलेल्या एका झाडाखाली दारू पिण्याचा बहाणा केला. 

दारुत वीष कालवून हत्या

दारू पितेवेळेस गाडीतील पाण्याची बाटली घेऊन ये, असे म्हणत भीमराव यास गाडीकडे पाठवून त्याच्या दारूच्या ग्लासात विष मिसळले. त्यानंतर त्यात पाणी मिसळून भीमराव यास दारू पाजली. थोड्याच वेळात विषारी द्रवामुळे त्याच्या पोटात वेदना होऊन घसा कोरडा पडला. अशा अवस्थेत नागोराव लोणे याने शेतालगत असलेल्या नालीजवळ नेऊन त्याचे डोके नालीवर आदळून अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या नाका- तोंडातून रक्तस्त्राव झाला. यात तो जागेवर गतप्राण झाल्याची माहिती लोणे याने पोलिसांना दिली.

येथे क्लिक करा - राज्यातील `या` जिल्ह्यात ऊसाचे फड दारुचे अड्डे

३० मेपर्यंत पोलिस कोठडी

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाठवून घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी मष्णाजी लालू फरसे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता. १५) देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसांनंतर आरोपी नागोराव लोणे यास तेलंगणातील कोटचीर येथून, तर त्याच्या पत्नीस तमलूर येथून गुरुवारी (ता. १४) अटक केली होती.