esakal | माधुरीची अंधत्वावर मात; प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठानच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना कलावंतांपर्यंत पोहोचविण्याकरीता तसेच कलावंतांना विविध पातळीवर स्थान प्राप्त करुन देण्याकरीता हे प्रतिष्ठान राज्यात कार्य करीत आहे

माधुरीची अंधत्वावर मात; प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठानच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यातील कलावंतांसाठी एकमेव काम करणारी प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठान या न्यास प्रतिष्ठानच्या नांदेड जिल्हा महिला अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध कलावंत, गायक माधुरी भालेराव नांदेडकर यांची निवड राज्य अध्यक्षा संगीता ठोंबरे व राज्य अध्यक्ष प्रकाश अवचार यांनी केली आहे. विशेष म्हणजे माधुरी ह्या दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. मात्र त्यांनी अंधत्वावर मात करत आपली कला जोपासली. त्या कलेवर आज त्यांचे नाव संबंध राज्यभर आहे.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना कलावंतांपर्यंत पोहोचविण्याकरीता तसेच कलावंतांना विविध पातळीवर स्थान प्राप्त करुन देण्याकरीता हे प्रतिष्ठान राज्यात कार्य करीत आहे. या सक्रीय प्रतिष्ठाने माधुरी भालेराव नांदेडकर यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांनी तात्काळ या पदाचा पदभार स्विकारुन कामाला सुरुवात केली आहे. लवकरच जिल्हा कलावंत यांचा मेळावा आयोजित करणार असल्याचे माधुरी भालेराव यांनी सांगितले.

हेही वाचाअंगाचा थरकाप उडविणारी घटना : हिंगोली, जिंतूर व औंढाचे प्रवाशी सुखरुप; चालत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट

वारकरी, माळकरी, टाळकरी, भजनकरी, गायक, शाहीर विविध प्रकारचे कलावंत यांना जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्यरत राहणार आहे.

प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठान नांदेड जिल्हा महिला आध्यक्षपदी माधुरी भालेराव नांदेडकर यांची निवड झाल्याबद्दल सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सूर्यभानजी ताकतोडे, मंगेश शिवणीकर (मुंबई), पवन भालेराव (वाशिम), गुरुदेव माऊली, विठ्ठल रनबावळे (अमरावती), दिनकर रनबावळे (अकोला), जयराम वायसे (बुलढाणा), भीमराव ताकतोडे (नागपूर), इंजि. भाऊसाहेब घोडे, इंजि. सी. एम. पार्डीकर, एन. एम. बेंद्रीकर आदींनी अभिनंदन केले आहे.

loading image