Board Exams : विद्यार्थ्यांनो, टेन्शन आलंय? कॉल करा! दहावी, बारावीच्या परीक्षार्थींसाठी बाेर्डाचे आवाहन

Exam Preparation : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन सेवा उपलब्ध करायला सुरुवात केली आहे. परीक्षेच्या ताणामुळे अस्वस्थ झालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशकांकडून मदतीसाठी कॉल करण्याचे आवाहन केले आहे.
Board Exams
Board Exams sakal
Updated on

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी अभ्यासात गुंतल्याचे दिसून येत आहे. पण, परीक्षेचा ताण आला असेल, अस्वस्थ वाटत असेल, चिंता वाटत असेल तर समुपदेशकांना दूरध्वनी करून चिंतामुक्त व्हा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com