
Nanded News
sakal
नांदेड : जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकनग्रस्तांना मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘डीबीटी’द्वारे सोमवारपासून (ता. २२) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.