
दबाव टाकून महाविकास आघाडी दबणार नाही, अशोक चव्हाणांचा भाजपला इशारा
नांदेड : आघाडीत काम करताना एकमेकांचे पक्ष फोडू नयेत, असा सल्ला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना दिला आहे. नांदेड (Nanded) येथे काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियनात ते बोलत होते. चव्हण म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या समस्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. काँग्रेस फोडण्याचा कोणी प्रयत्न करित असेल तर ते चालणार नाही. भाजपमधील अनेक जण पक्षात परत आले आहेत. निवडून आलेले लोकप्रतिनिधी फोडा आणि पक्षात घ्या अशी भूमिक आम्ही घेतलेली नाही, असे चव्हाण म्हणाले. (Mahavikas Aghadi Not Bend, Ashok Chavan Warns BJP In Nanded)
हेही वाचा: Nanded : नांदेडमध्ये बहिणीला भेटायला जाणाऱ्या भावाचा निर्घृण खून
दबाव टाकून महाविकास आघाडी दबणार नसल्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला. पातळी सोडून राजकारण केले जात असल्याने ते लोकशाहीला मारक असल्याचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.
Web Title: Mahavikas Aghadi Not Bend Ashok Chavan Warns Bjp In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..