esakal | माहूर पोलिसांनी पकडला दोन लाखांचा गुटखा
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर पोलिसांनी जप्त केलेला गुटखा

माहूर पोलिसांनी पकडला दोन लाखांचा गुटखा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : माहूर पोलिसांनी मंगळवारी (ता. १५) पहाटे गस्तदरम्यान एका ढाब्यात दडवून ठेवलेला बंदी अशलेला दोन लाखाचा गुटखा जप्त केला. यावेळी एकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहूरचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे आणि त्यांच्या सहकारी अंमलदारानी माहूरजवळ असलेल्या विक्की ढाब्यात मंगळवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास धाड टाकली. त्या ठिकाणी साठवलेला प्रतिबंधित असलेला व चार नायलॉन पोत्यांमध्ये भरलेला गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. त्या ठिकाणी सापडलेल्या गुटख्याची किमत दोन लक्ष रुपये आहे. याबाबत माहूर पोलिसांनी विजय कबीरदास कांबळे ( वय-49 ) विरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई राहेबराव सगरोळीकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे करत आहेत.

हेही वाचा - काळजाला पाझर फुटावी, अशी सीताबाई बर्वेंची व्यथा

माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. या भागात देशी दारु, हातभट्टी आणि गुटखा विक्री जोरात चालत असते. पोलिसांच्या कारवाईने काही दिवसा हे धंदेचालक शांत बसतात. परंतु काही दिवसांनी पुन्हा डोके वर काढतात. माहूर पोलिसांनी या धंद्यावर प्रतिबंध बसवावा अशी मागणी या भागातील नागरिक नेहमीच करत असतात.

loading image