esakal | सीताबाईंसाठी 'तो' जणू एक देवदूतच.. आयुष्यातील अंधार झाला कायमचा दूर!
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen got eyes

देवदूतांच्या दातृत्वाने सीताबाईंना मिळाली दृष्टी

sakal_logo
By
एस.डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोनाच्या (coronavirus) अस्थिर स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात (medical sector) काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासला जात असताना याउलट कुठे माणसातील संवेदना अजूनही जिवंत असल्याचे दर्शन घडत आहे. घरी अठराविश्‍व दारिद्रय, मजुरी करून पोटाची खळगी भरली. आता वार्धाक्यात थकलेल्या शरीराला अनेक व्याधी. त्यात आठ दिवसांपासून मोतीबिंदू खराब झाल्याने डोळ्याला काहीच दिसेना. काळजाला पाझर फुटावी, अशी सीताबाई बर्वे (रा. लाखलगाव) यांची व्यथा. सीताबाईंना दृष्टी मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डोखळे मदतीला धावले. ( senior-citizen-got eye-vision-by-help-of-balasaheb-dokhale)

सीताबाईंसमोरील अंधार झाला दूर

नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुनील शेजवळ, डॉ. उमेश आहेर यांनी निःस्वार्थ भावनेतून सीताबाईंसमोरील अंधार दूर केला. आयुष्यभर काबाड-कष्ट करून थकलेल्या सीताबाई बर्वे (वय ७५) यांच्या आयुष्याच्या सांयकाळी नेत्रविकाराने झडप घातली. आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना डोळ्यावर वेळीच उपचार करता आले नाहीत. गेल्या आठवड्यात सीताबाईंनी पूर्ण दृष्टी गमावली. तत्काळ शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. सीताबाई नातीसमवेत पिंपळगावच्या नेत्रलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनील शेजवळ यांच्याकडे उपचारासाठी आल्या. डॉ. शेजवळ यांनी शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदत

गरिबांना नेहमीच अत्यल्प दरात उपचार करणारे डॉ. शेजवळ यांनीही पैशांचा विचार केला नाही. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचे देवदूत ठरलेले डॉ. उमेश आहेर यांनी प्रयोगशाळेतील चाचण्या मोफत करून दिल्या. दातृत्वांची भावना हा स्थायीभाव असलेले पूजा ट्रेडर्सचे बाळासाहेब डोखळे यांनी बर्वे आजींच्या शस्त्रक्रियेला येणारा खर्चाचा भार उचलला. डॉ. शेजवळ यांनी बर्वे आजींच्या दोन्ही डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. शेजवळ, डॉ. आहेर व डोखळे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने सकाळी डोळ्यासमोर अंधार असलेल्या सीताबाईंना दृष्टी लाभली.

हेही वाचा: बर्थडे सेलिब्रेशन पडले महागात; मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

बर्वे आजींना आनंद देता आला. याचा आनंद कशातच मोजता येणार नाही. डॉ. शेजवळ, डॉ. आहेर यांचा पैशापेक्षा माणुसकी धर्म मोठा हा संदेश दिला. - बाळासाहेब डोखळे, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा: भाजपचे नेते राऊत यांच्या मुक्कामी; नाशिकमध्ये चर्चेला उधाण

loading image
go to top