जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या ’त्या’ मेलने उडाली प्रशासनाची धांदल  

file photo
file photo

नांदेड : एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिवस रात्र एक करत असताना दुसरीकडे त्यांना एका अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या मेलने प्रशासनाची धांदल उडाली. मला आपली मदत हवी असा संदेश असलेला मेल जिल्हाधिकारी यांच्या नावे आल्याने वजिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोना या महाभयंकर आजाराने संबंध जगाची झोप उडविली आहे. या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सुचनामागील दोन महिण्यापासून सुचना देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे सुद्धा अथक परिश्रम घेत असून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी सर्व सहकाऱ्यांना घेऊन ते मोट हाकत आहेत. त्यांना यशही येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त कोरोनाचे दोन रुग्न आढळले. 

जिल्हा निवडणूक विभागात मेल

लॉकडाउनच्या कडक नियमांची अंमलबजावणी करत असतांना अचानक त्यांच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या कार्यालयीन मेलवर dr. vipin itankar ias excultivedirector24135@gmail.com या इमेल आयडीवरुन dydeonanded@gmail.com वर need a favor from you please mail me back as soon as possibal असा एक संदेश आला. त्यात मला आपली मदत हवी असा संदेश होता. त्या मेलची खात्री केली असता तो बनावट मेल असल्याचे प्राथमीक चौकशीत पुढे आले आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल

या मेलमुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली. निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक मरळ यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हे प्रकरण तपासासाठी सायबर सेलकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. 

करखेलीत २५ हजाराचा गुटखा जप्त 

धर्माबाद : एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. लॉकडाऊनमध्ये तालुक्यातील करखेली येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या घरावर पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) रात्री छापा टाकून अंदाजित २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले आहे.

कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. त्यात सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. लॉकडाऊन दरम्यान तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढ्या भावाने धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री होत आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे अवैध गुटखा विक्री जोमाने होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना मिळाली होती.

पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची कारवाई

सदरील घटनेची दखल पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे यांना करखेली येथे गुटखा विक्री करणाऱ्यांच्या घरावर छापा मारण्याचे सुचना दिले. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे यांनी मंगळवारी रात्री करखेली येथील शेख वशीद शेख अहमद, सय्यद अनिस सय्यद मुद्दीन यांच्या घरावर छापा टाकून घराची झडती घेतली असता तिथे आर. के, राज, सागर, नजर यासह विविध कंपन्यांचा गुटखा अंदाजित २५ हजार रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा सापडला. 

धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वरील दोघांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी पोलिस स्टेशनकडे फिरकले नव्हते. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगारे, करखेलीचे बिट जमादार श्यामसुंदर भवानगिरकर, पोलीस हे. कॉ. सूर्यकांत नागरगोजे, पोलीस नाईक श्याम गिरी, दत्ता ढगे, महिला पोलीस कर्मचारी सोळंके आदींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com