
Illegal Sand Mining
sakal
मारतळा : कामळज (ता. लोहा) शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी (ता. दहा) दुपारी दोनपर्यंत कारवाई केली. या कारवाईत यंत्रसामग्रीसह एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा नोंद करून जप्त केलेल्या मोठ्या चार बोटी जिलेटिनद्वारे स्फोट घडवून नष्ट करण्यात आल्या आहेत.