Makarsankrant Special पतंग उडवा; पण जरा जपूनच 

प्रमोद चौधरी
Sunday, 10 January 2021

मकरसंक्रांतीचा सण अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपला असून, पतंगप्रेमी आनंदले आहेत. परंतु, आनंदामध्ये विघ्न येवू नये म्हणून धातुमिश्रीत मांजापासून सावध राहण्याची गरज आहे.

नांदेड : अवघ्या चार दिवसांवर असलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पण, पतंग उडविताना योग्य काळजी न घेतल्यास प्राणाला मुकावे लागू शकते. आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये, यासाठी पतंगप्रेमींनी आवश्यक सावधिरी बाळगणे आवश्यक आहे. 

पतंग उडविण्याचा मोह सर्वांनाच होतो. मात्र, शहरात वीज वितरणआच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांभांवर अडकतात. ते काढण्यासाठी काठ्या, लोखंडी सळई किंवा गिरगोटचा वापर बहुतांशवेळा केला जाते. हे करताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता दाट असते. हा प्रकार जीवावर बेतू शकतो. 

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील युनियन बँकेच्या व्यवस्थापकाचा प्रताप. मयत शेतकऱ्याच्या नावावर उचलले एक लाखाचे कर्ज, युनियन बॅंक ऑफ इंडियाचा प्रताप, शाखा व्यवस्थापकासह १३ जणावर गुन्हा दाखल

प्राणांतिक अपघाताची दाट शक्यता
अनेकदा मुले व युवक घराच्या गच्चीवरून पतंग उडवित असतात. परंतु, तेही धोक्याचे असते. पतंग काटाकाटीच्या नादामध्ये गच्चीवरून खाली पडण्याची दाट शक्यता असते. अशा घटना दरवर्षीच घडतात. त्यामुळे घराच्या गच्चीवर पतंग न उडविता मोकळ्या मैदानात किंवा परिसरातील मोकळ्या जागांमध्येच पतंग उडवावेत. पतंग उडविताना पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून मांजा वापरू नये. तसेच बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मांजा ओढताना तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसक्रिय होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो. 

हे देखील वाचाच - काय म्हणता ? शहरालगत गोदावरीचे 30 टक्के पाणी प्रदूषित

पतंग जपूनच उडवा
सध्या बाजारात धातुमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा मांजा वीजप्रवाहित तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहित्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन अपघाताची दाट शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवा, पण जरा जपूनच, याची खबरदारी घेणेच उचित ठरणार आहे. 
  
हे लक्षात ठेवा 

  • तारांवर अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरते 
  • वीज तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये 
  • वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा 
  • दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये 
  • पतंग उडविताना मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे 
  • पतंग मोकळ्या जागेतच उडवावेत

नांदेड जिल्ह्यातील इतरही घडामोडी वाचण्यासाठी येेथे क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makarsankrant Special Fly a kite But just be careful Nanded Kite Festival