esakal | गाव कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहिले तर आवश्यक ती दक्षता, काळजी घेऊन कोरोणाचं संसर्ग ग्रामीण भागात कमी होऊ शकतो. यासाठी गावातील प्रमुख शासकीय कर्मचारी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांनी मुख्यालय राहणे गरजेचे आहे.

गाव कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, खते बी-बियाणे खरेदीमध्ये फसवणूक होऊ नये. बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची जादा दराने विक्री होऊ नये. यासाठी ग्रामीण भागातील शासनाची महत्त्वाची पदे असलेली तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

गावातील कर्मचारी मुख्यालयी राहावे
कोरोनाव्हायरसने ग्रामीण भागातही आता पाय रोवायला सुरवात केली आहे. बाहेर घेऊन आलेल्या व्यक्तीमुळे ग्रामीण भागातल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागण होत आहे. जिल्ह्यात अशी बरीच प्रकरणे सापडली आहेत. या बाबत शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहिले तर आवश्यक ती दक्षता, काळजी घेऊन कोरोणाचं संसर्ग ग्रामीण भागात कमी होऊ शकतो. यासाठी गावातील प्रमुख शासकीय कर्मचारी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांनी मुख्यालय राहणे गरजेचे आहे. 

हेही वाचा.....होमिओपॅथिक औषधी मोफत वितरण करा

जिल्हा प्रशासनाने पावले उचलावी 
येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बियाण्याची कुठलीही अडचण होणार नाही. पेरणी करता शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायकांनी त्यांच्या मुख्यालयी मुक्कामी राहून मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, खरीप हंगामात त्यांना पेरणीसाठी फायदा होईल. याबाबत जिल्हा प्रशासनाने तत्काळ योग्य ती पावले उचलून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या तिघांनाही मुख्यालय राहणे बंधनकारक करावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढावा अशी आग्रही मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.

हेही वाचलेच पाहिजे.....संवेदनशील मनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना आधार ....कुठे ते वाचा

कर्ज मागणीसाठी कर्मचाऱ्यांची गरज
कोरोना विषाणूमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतमाल घरात पडून आहे. अशावेळी पेरणीसाठी खते बियाणे औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे. या काळात शेतकऱ्यांना पिककर्जाची आवश्यकता असते. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी गाव कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

loading image
go to top