तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन आवश्यक | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तूरीवरील शेंगा
तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन आवश्यक

नांदेड : तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन आवश्यक

नांदेड : जिल्ह्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडल्याने तुरीचे पिक चांगले आहे. येत्या पंधरवाडयात सदर पिक फुलोऱ्यावर येईल. शेतकरी बंधुंना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मागील आठवडयात असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याचे व्यवस्थापन वेळीच करण्याची गरज असल्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: वाहाळा गावातील वीजपुरवठा खंडीत

ते म्हणाले की, तुरीवरील किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे सद्यस्थितीत अत्यावश्यक झाले आहे. शेंगा पोखरणारी अळी ही तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मिलीमीटर लांब, पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या अशा विविध रंगात दिसून येते. मोठ्या अळ्या या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंगाची अळी १२.५ मिलीमीटर लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगांवरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून शेंगेतील दाणे पोखरते. शेंगे माशी ही बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगेच्या आत राहून शेंगांतील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाणे खराब होतात.

असे करा व्यवस्थापन 0- प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात. 0- पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना) निंबोळी अर्क पाच टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि.(१x१० ९ पिओबी/मिली) ५०० एल.ई./ हे. किंवा बॉसिलस थुरिंनजिएंसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मिलीलीटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 0- दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी) : इमामेक्टीन बेझोएट पाच टक्के एस जी तीन ग्रॅम किंवा लँब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी 0- अळयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

loading image
go to top