

25-year-old Mandar Bodhkule dies suddenly, leaving behind dreams of a career and supporting his family
Sakal
देगलूर : आयुष्याची असंख्य स्वप्ने डोळ्यांत साठवून नव्या उमेदीने जगण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने क्रूर घाव घातला. शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आधार बनण्याची आस बाळगणाऱ्या मरखेल येथील मंदार माधवराव बोधकुले (वय २५) यांचे रविवारी ता.९ रोजी पहाटे घरी झोपेत असतानाच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.