नांदेडमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरले 

अभय कुळकजाईकर
Monday, 9 November 2020

नांदेड शहरातील मगनपुरा भागातील पोचम्मा माता मंदिर येथून राजश्री यशवंत शिंदे (वय ४०, रा. वसंतनगर) या महिला त्यांच्या घराकडे वसंतनगरला रविवारी (ता. आठ) सायंकाळी सव्वासात वाजता पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकाने पत्ता विचारण्याचा बहाण करून थांबवले. त्यानंतर बोलण्यात गुंग ठेऊन त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे दोन तोळ्याचे मिनी गंठण जबरीने हिसका देऊन तोडून घेतले आणि नंतर दुचाकीवरून पळून गेले.

नांदेड - पायी चालत जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या तिघाजणांनी तिच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकाऊन नेले. सदरील महिलेने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले पण तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. 

नांदेड शहरातील मगनपुरा भागातील पोचम्मा माता मंदिर येथून राजश्री यशवंत शिंदे (वय ४०, रा. वसंतनगर) या महिला त्यांच्या घराकडे वसंतनगरला रविवारी (ता. आठ) सायंकाळी सव्वासात वाजता पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकाने पत्ता विचारण्याचा बहाण करून थांबवले. त्यानंतर बोलण्यात गुंग ठेऊन त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे दोन तोळ्याचे मिनी गंठण जबरीने हिसका देऊन तोडून घेतले आणि नंतर दुचाकीवरून पळून गेले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार केदार करत आहेत. 

हेही वाचा - नांदेड शहरामध्ये ऐकू आले भूगर्भातून दोन आवाज

बारा हजाराचा मोबाईल चोरला 
नांदेड - देगलूर नाका भागातील खुबा मस्जीदजवळ उर्दूचे शिक्षक सय्यद रफिक बागवान (वय ३४, रा. खुसरोनगर) हे शनिवारी (ता. सात) सकाळी दहाच्या घरात काम करत होते. त्यावेळी त्यांच्या घरातील १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेण्यात आला. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार रसुल करत आहेत. 
 
वाद घालून एकाला चाकूने मारहाण 
नांदेड - शहरातील पक्की चाळ भागातील चौकी समोर असलेल्या बेकरीजवळ रोहन राजू खाडे (वय १६, रा. देगाव चाळ) हा उभा होता. त्यावेळी आरोपितांनी संगनमत करून जुन्या भांडण्याच्या कारणावरून वाद घातला. दुकानासमोर यायचे आणि थांबायचे नाही, असे सांगितल्यामुळे त्यावरून राग मनात धरून त्यास चाकूने मारून गंभीर दुखापत केली. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार जाधव करत आहेत. 
 
हेही वाचलेच पाहिजे - परभणीचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर, शेकोट्या पेटल्या

नालीवर स्लॅब टाकण्यावरून मारहाण 
नांदेड - नई आबादीतील मगदुमनगर येथील शेख मुजीब शेख रशिद (वय ३०) यांच्या घरासमोरील नालीवर स्वॅब टाकण्याचे काम रविवारी (ता. आठ) रात्री बाराच्या सुमारास सुरू होते. त्यावेळी स्लॅब टाकण्यावरून वाद घालून आरोपितांनी मुजीब शेख यांना नाकावर मारून जखमी केले तसेच त्यांच्या भावास रॉड आणि चाकूने मारून हाताच्या करंगळीवर गंभीर दुखापत केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक सानप करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalsutra stolen from woman's neck in Nanded, Nanded news