Nanded News: अतिवृष्टीचा फटका; नांदगावच्या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे संपविले जीवन
Marathwada Crisis : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविले. राजीव भरकडे या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मारतळा : सततची नापिकी, आता झालेली अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे नांदगाव (ता. लोहा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने खदानीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. सहा) दुपारी उघडकीस आली.