मराठवाड्याच्या विकास प्रश्‍नावर मराठवाडा जनता विकास परिषदेची मुख्यमंत्र्यांशी भेट घडविणार-अशोक चव्हाण

प्रल्हाद कांबळे
Monday, 15 February 2021

शासनमान्य नांदेड आयुक्तालयाची अंमलबजावणी करावी, नांदेड तेलंगाना सीमेवरील अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या लेंडी धरणाची घळभरणी येणार्‍या पावसाळ्यापूर्वी व्हावी.

नांदेड : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने रविवारी (ता. १४ ) फेब्रुवारी रोजी नियोजन भवनात बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन मराठवाडा व नांदेडमधील विविध प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा केली. 

शिष्टमंडळाच्यावतीने मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अशोक चव्हाण यांनी विकासनिधी खेचून आणून समृध्दी मार्ग व इतर विकासकामे मार्गी लावल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत नामदार चव्हाण यांनी मराठवाडा व विदर्भ विकास मंडळास मुदतवाढ देण्यासंबंधी लक्ष घालावे. शासनमान्य नांदेड आयुक्तालयाची अंमलबजावणी करावी, नांदेड तेलंगाना सीमेवरील अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या लेंडी धरणाची घळभरणी येणार्‍या पावसाळ्यापूर्वी व्हावी.

हेही वाचानांदेड : भेंडेवाडी व महालिंगी गावातील ५७ कृषिपंप ग्राहकांचे वीजबील झाले कोरे

यांची होती उपस्थिती 

नांदेड शहरातील गोदावरी शुध्दीकरण इत्यादी प्रश्‍नांवर चर्चा केली. हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणू असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेड शहर व मराठवाड्याच्या इतर प्रश्‍नांवरही चर्चा झाली.
मराठवाड्याचे इतर प्रश्‍न मार्गी लावावेत यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदचे लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्याने अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या विचारात आहे. यावेळी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, इंजि. द. मा. रेड्डी, डॉ. अशोक सिध्देवाड, प्राचार्य गोपाळराव कदम, प्रा. उत्तमराव सूर्यवंशी, डॉ. एल. पी. शिंदे, संभाजी शिंदे, डॉ. बालाजी कोम्पलवार इत्यादी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Janata Vikas Parishad will meet the Chief Minister on the issue of Marathwada-Ashok Chavan nanded news