esakal | मरखेल : दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत पत्रकार प्रशांत माळगेसह दोन ठार
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकार प्रशांत माळगे अपघातात ठार

मरखेल : दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत पत्रकार प्रशांत माळगेसह दोन ठार

sakal_logo
By
सद्दाम दावणगीरकर

मरखेल ( जिल्हा नांदेड ) : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले आहेत. या दोघांपैकी दुचाकीवर स्वार असलेल्या हाणेगाव येथील तरुण पत्रकार प्रशांत माळगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराचा उपचारास नेत असताना वाटेत मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वझर- हाणेगाव रोडवरील एकंबेकर महाविद्यालयाजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, हाणेगाव भागातील तरुण पत्रकार प्रशांत एकनाथ माळगे हे आपल्या स्वतःच्या दुचाकीवरुन त्यांचा सहकारी बाळासाहेब विठ्ठलराव आडेकर याच्यासोबत कुडली येथे कामानिमित्त जात होते. हणेगाव- वझर रस्त्यावर एकंबेकर महाविद्यालयाच्या पुढे विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकी ( एम. एच. २६ एडब्ल्यू ५४६१) च्या चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोरुन धडक दिल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा - वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांना हायसे वाटले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर गळती बंद झाली. यानंतर क्रेनच्या साहयाने उलटलेला टँकर सरळ करण्यात आला

या धडकेत प्रशांत माळगे (वय ३८) यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या बाळासाहेब आडेकर हेदेखील जखमी झाले आहेत. या अपघाताविरुद्ध दिशेने येत असलेल्या कोंडीबा माधवराव रुपनर (वय ४१) रा. करडखेड ता. देगलूर व त्यांच्यासोबत असलेले परशुराम नारायण गोपणर (रा. शिरुर दबडे ता. मुखेड) हे दोघे जखमी झाले होते. यातील कोंडीबा रुपणर यांचा नांदेडला उपचारास नेत असताना वाटेत मृत्यू झाला आहे. दरम्यान माळगे यांचा मृतदेह हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर रुपणर यांच्या मृतदेहावर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी बाळासाहेब विठ्ठलराव आडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यतळ करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image