esakal | मास्तर तुम्हीपण : अर्धापूरच्या जुगार अड्ड्यावरुन चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक; स्थागुशाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर क्राईम न्यूज

मास्तर तुम्हीपण : अर्धापूरच्या जुगार अड्ड्यावरुन शिक्षकांसह नऊ जणांना अटक; स्थागुशाची कारवाई

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : अर्धापूर तालुक्यात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाभड ते बामणी जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या संतोष टेकाळे यांच्या आखाड्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बुधवारी (ता. नऊ) रात्री उशिरा कारवाई केली. यावेळी पोलिसांनी चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 37 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करुन अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की अर्धापूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार आशिष बोराटे हे आपल्या पथकासह गस्त घालत होते. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी दाभड ते बामणी जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संतोष पुरभाजी टेकाळे यांच्या शेतातील एका शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी नगदी 37 हजार 130 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. फौजदार आशिष बोराटे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात मटका जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार श्री लांडगे करत आहेत.

हेही वाचा - अनेकदा परफ्युमवरुन तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वभावाचा अंदाज लावता येतो

हे आहेत जुगार अड्ड्यावरील आरोपी

रवींद्रसिंग मोहनसिंग गाडीवाले, राहणार टाउन मार्केट दत्तनगर नांदेड, रामकृष्ण हरीहरराव लोखंडे, शिक्षक रा. दाभड, तालुका अर्धापूर, संजय माधवराव माहुरकर, शिक्षक राहणार महसुलनगर तरोडा बुद्रुक नांदेड, चंपत उत्तमराव मुनेश्वर, शिक्षक राहणार तामसा, तालुका हदगाव हल्ली मुक्काम झेंडा चौक कॅनल रोड नांदेड, रमेश अर्जुन रणवीर सेवानिवृत्त सैनिक राहणार गुरुनगर ग्यानमाता शाळेजवळ नांदेड, लक्ष्मण दत्‍तराम शिंदे, शिक्षक राहणार दहिकळंबा तालुका कंधार हल्ली मुक्काम बाफना नांदेड, वसंत बळीराम टेकाळे राहणार दाभड, राजू माणिकराव टेकाळे राहणार दाभड आणि संतोष पुरभाजी टेकाळे राहणार दाभड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.