लाॅकडाउनमध्ये जुळली दुरावलेली नाती, कशी? ते तुम्ही वाचाच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

सर्वप्रकारची वाहतूक, बाजारपेठा, उद्योग-व्यवसाय आदी बंद पडल्याने रोजगाराचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ लागला. त्यामुळे अनेकांनी आपले गाव जवळ केले आहे.

नांदेड : देश लॉकडाउन झाल्याने असंख्य लोकांचा  रोजगार हिरावला आहे. परिणामी, ‘आपलं गाव बरं’ म्हणून अनेक मजूर, कर्मचारी हे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे लॉकडाउनमुळे दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

गावामध्ये रोजगाराच्या संधी नसल्यामुळे अनेकांनी गाव सोडून शहरे गाठली होती. त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत सुरु असतानाच कोरोनाचे संकट पुढे आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे सर्वप्रकारची वाहतूक, बाजारपेठा, उद्योग-व्यवसाय आदी बंद पडल्याने रोजगाराचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ लागला. त्यामुळे अनेकांनी आपले गाव जवळ केले आहे.

हेही वाचा - उदरनिर्वाहाचा प्रश्न, तरीही कोरोनाला हरविण्याची जिद्द 
 

संचारबंदीमुळे सगळेच घरी बसून आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवस घालवत आहेत. वेळ घालवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे पर्याय देखील शोधून घेतले. कोणी मुलांसोबत वेळ घालविला तर कोणी वाचनाचा पर्याय स्वीकारला. गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या, गर्दीची सवय असलेल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंग कठीण असल्याची जाणीव लवकरच झाली. अशावेळी आठवली जुनी मैत्री, शाळा-काॅलेजातील दोस्त. संपर्काबाहेर गेलेल्या जुन्या मित्रांचे फोन नंबर मिळवून संवाद सुरु झाला. त्यामुळे संरचारबंदीत दुरावलेली नाती जवळ आली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

हे देखील वाचा - सोयाबीनच्या अधीक उत्पादनासाठी ‘अशी’ करा पेरणी

संचारबंदीमुळे प्रत्येकाला घरी बसावे लागले. घरी बसून काम झाले की, फावल्या वेळेत काय करावे हीच प्रत्येकाला चिंता होती. आजही आहे. त्यातच फेसबुकवर सुरु असलेल्या जुन्या फोटोंना कमेंटस करण्याच्या ट्रेण्डचा प्रत्येकाला फायदा झाला आणि कधीकाळी काळाच्या ओघात नजरेआड गेलेले चेहरे पुन्हा दिसून लागले. त्यामुळे नकळत त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण, त्या आठवणींचाही उजाळा झाला. काहीही वैर नाही, मात्र जगण्याच्या स्पर्धेमुळे ज्यांच्या सहवासाला मुकावे लागले त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला आणि मग निसर्गतःच त्यांच्याशी बोलण्याची प्रत्येकाला इच्छा होऊ लागली. अनेकांनी क्रमांक नसल्याने फेसबुक मेसेंजरची मदत घेत आप्तस्वकीयांशी संपर्क साधताना दिसत आहे. 

येथे क्लिक कराच - Video: चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करा ः शास्त्रज्ञ डॉ. यू. एन. आळसे
 

आठवणींना दिला जात आहे उजाळा
शालेय जीवनात जगलेले दिवस प्रत्येकालाच आठवत असतात. महाविद्यालयीन जीवनातील अनेक प्रसंग, मित्र आणि आयुष्यातील पहिले प्रेम आठवणीच्या सागरात कुठेतरी सुखरुप असतात. सोशल मिडियाने गेल्या काही वर्षात असे अनेक नाते जुळवलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याची संधी आता अनेकांना मिळते आहे. ज्यांनी स्वतःचे अकाउंट गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उघूडूनही बघितलेले नव्हते, त्यांनी जुने छायाचित्र पुन्हा उघडून बघितलेले आहेत. अनेकांनी तर विनोदीशैलीत कमेंटसही केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matching Estranged Relatives In Lockdown Nanded News