esakal | नांदेडातील मटका हायटेक, मोबाईलवरुन आकड्यांची शाळा, कमल यादववर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मोबाईलवरुन आकड्यांची शाळा सुरु असून या मटका माफिया पुन्हा जोमाने सक्रीय झाले आहेत. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कमल यादवसह अन्य जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

नांदेडातील मटका हायटेक, मोबाईलवरुन आकड्यांची शाळा, कमल यादववर गुन्हा 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मागील काही दिवसांपासून मटका, जुगार हे अवैध धंदे काही प्रमाणात बंद असल्याचा दावा पोलिस विभागाकडून होत होता. मात्र तसे काही नसुन आता कल्याण- मिलन नावाचा मटका हायटेक झाला आहे. मोबाईलवरुन आकड्यांची शाळा सुरु असून या मटका माफिया पुन्हा जोमाने सक्रीय झाले आहेत. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कमल यादवसह अन्य जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील मटका माफियावर काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. त्यांना अटक करुन कारागृहात दाखल केले होते. मात्र मटका माफियांची सुटका कोरोनामुळे लवकर झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा आकड्यांचा खेळ सुरू केला होता. भाग्यनगर ठण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन मटका बुकींना पकडण्यात आले. या प्रकरणातही कमल यादव याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोरोना काळात बंद असलेला मटका आता नव्याने सुरू झाला आहे. परत मटका खेळणारे आता हायटेक झाले आहेत. चिठ्ठीचा खेळ आता रहिला नाही. थेट मोबाईल वरून आकडे देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना आवर घालण्यात पोलिस यंत्रणेलाही अडचण येत आहे.

हेही वाचाहल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल -

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

शहरातील छत्रपती चौक भागात एका कॉम्प्लेक्समध्ये आकड्यांचा खेळ सुरू होता. पोलिसांनी या अड्ड्यावर कारवाई केली. यावेळी तेथून काही जुगारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून च हजार २०० रुपये व मटका जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी श्री. हातीहंबीरे आणि सूर्यकांत गायकवाड या दोघांना पकडले. या दोघांनी आपण कमल यादव याच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कमल यादव याच्यावरही गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे पुन्हा कमल यादव प्रकाशझोतात आला आहे.

सट्टेबाजार करणारेही सक्रीय

शहरातील मटका, आयपीएलच्या काळात सट्टेबाजांनी आपले नशीब अजमावून पाहिले आहे. अनेक मटका बुकी आता मटका सोबतच आयपीएल'वर सट्टेबाजी करीत आहेत. इतवारा व देगलुर पोलिसांनी कारवाई करुन सट्टेबाजाराना अटक केली होती. प्रत्यक्षात या मटका बुकी चालवणाऱ्या माफियांना जर पकडले तर सट्टेबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते. शहर व जिल्ह्याती मटका, गुटखा, जुगार, अवैध दारु विक्री व साठा करणाऱ्यांची गोपनिय माहिती काढून त्यांच्यावर कारवाईचा इशारा अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी दिला आहे.
 

loading image