esakal | 'या’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बोंढार (ता. नांदेड) येथे शुक्रवारी (ता. २२) सकाळी घडला. निर्दयी मातेने आपल्या दोन वर्षाच्या बालकाला कन्टेनरखाली फेकले. यात त्याचा चिरडून मृत्यू झाला. यावेळी त्या बालकाला वाचिवण्याच्या प्रयत्नात कन्टेनर रस्त्याच्या कडेला पलटला. 

'या’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत सुखी संसाराची वेली फुलवावी व आपल्या माहेरवासीयांना अभिमान वाटावा असे नांदावे. परंतु काही महिला लग्नानंतरसुद्धा आपल्या जोडीदाराला धोका देऊन दुसऱ्यासोबत अनैतीक संबंध ठेवतात. त्याचे परिणाम तिला व परिवाराला भोगावे लागतात. असाच एक प्रकार शहरापासून जवळच असलेल्या बोंढार (ता. नांदेड) येथे शुक्रवारी (ता. २२) सकाळी घडला. निर्दयी मातेने आपल्या दोन वर्षाच्या बालकाला कन्टेनरखाली फेकले. यात त्याचा चिरडून मृत्यू झाला. यावेळी त्या बालकाला वाचिवण्याच्या प्रयत्नात कन्टेनर रस्त्याच्या कडेला पलटला. 

बोंढार येथील विवाहीत बालाजी तिडके याच्यासोबत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील एका विवाहितेचा अनैतिक संबंध होता. हे संबंध एवढे वाढले होते की, बोंढार येथून तो व्यक्ती डोंगरकडा येते जात असे. हा प्रकार गंभीर असल्याने त्याच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्याला व तिला अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार उजागर झाल्यानंतर बालाजी तिडके याने पिडीत महिलेच्या पतीला सांगितले की मुलाला व त्याच्या आईला माझ्याकडे आणून सोड. आणल्यानतंर त्याने तिला स्विकारण्यास नकरा दिला.  

आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराची धलाई

बोंढारला का आलीस म्हणून तिच्या विवाहित प्रियकराच्या नातेवाईकानी त्यालाही व तिलाही बोदम मारहाण केली. हे प्रकरण चव्हाट्यावर येउ नये म्हणून गावातील प्रतिष्ठितांनी समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यावर काही परिणाम पडला नाही. शुक्रवारी (ता. २२) सकाळी रागाच्या भरात या महिलेनी आपल्या दोन वर्षाच्या बालकाला घेऊन बोंढारला लागुनच असलेल्या महामार्गावर आली. यावेळी हैद्राबादकडे जाणाऱ्या धावत्या कन्टेनरखाली (आरजे-९- जीबी-३८५०) फेकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कन्टेनर चालकाचा ताबा सुटला. त्याने ब्रेक जाग्यावरच लावल्याने कन्टेनर रस्त्याच्या कडेला पलटला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हेही वाचा -  अडीच लाखाचा गुटखा जप्त- पोलिस व एफडीएची कारवाई

पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी दिली भेट

यानंतर नांदेड ग्रामिण पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत दशपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. या प्रकरणाची माहिती घेतली असता पोलिस ही चक्रावून गेले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर महिलेस ताब्यात घेतले. यावेळी तिने पोलिसाना सांगितले की, माझे बोंढार येथील व्यक्तीशी प्रेमसंबंध आहेत. त्याला व मला गावकऱ्यांनी विनाकारण मारले. याचा राग मनात धरुन मी माझ्या पोटच्या गोळ्याला ट्रकखाली फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणी सदर महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात तिच्यासह काही मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गोविंद खैरे करत आहेत.