अर्धापूरचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी ठरणार

कार्यक्रम जाहीर, अशोक चव्हाण घेणार निर्णय
अर्धापूरचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष  ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी ठरणार
अर्धापूरचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशी ठरणारsakal

अर्धापूर : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सोम‌‌‌‌‌‌वारी (ता. १४) म्हणजेच व्हॅलेटाइन डे च्या दिवशी सत्तेची खुर्ची कोणाला ‘प्रपोज’ करते याकडे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतीत तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या कॉँग्रेसच्या कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची माळ पडणार? या बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून या निवडीसाठी कॉंग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गसाठी सुटले असल्याने सर्वच नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची स्वप्न पडत आहेत. नगरपंचायतीच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले असून कॉँग्रेसचाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीचे अधिकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण कोणत्या नगरसेवकाच्या नावाला पसंती देतात त्यावरच नगराध्यक्षपदाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, असे असले तरी इच्छुक नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला आहे. नगराध्यक्षपदासठी सोमवारी (ता. सात) नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. याच दिवशी या नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, वैध नामनिर्देशनपत्राची यादी बुधवारी (ता. नऊ)जाहीर करण्यात येईल. तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारिख गुरूवारी (ता. दहा) आहे. गरज पडल्यास सोमवारी (ता. १४) मतदान घेण्यात येईल तर याच दिवशी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com