नांदेडला विद्युतदाहिनी, खतनिर्मिती प्रकल्पाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी

अभय कुळकजाईकर
Thursday, 21 January 2021

नांदेडला वृक्षतोड टाळावी तसेच पर्यावरणास चालना देण्याच्या उद्देशाने गोवर्धनघाट शांतीधाम येथे नवीन विद्युतदाहिनी बसविण्यात येत आहे तर तुप्पा येथे घनकचरा निर्मूलनाअंतर्गत कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. 

नांदेड - शहरातील गोवर्धनघाट शांतीधाम येथील नवीन विद्युतदाहिनी व तुप्पा येथील घनकचर्‍यापासून तयार करण्यात येणार्‍या खतनिर्मितीचा प्रकल्पास महापौर मोहिनी विजय येवनकर आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी बुधवारी (ता. २०) भेट देऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.  

वृक्षतोड टाळावी तसेच पर्यावरणास चालना देण्याच्या उद्देशाने गोवर्धनघाट शांतीधाम येथे नवीन विद्युतदाहिनी बसविण्यात येत आहे तर तुप्पा येथे घनकचरा निर्मूलनाअंतर्गत कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. 

हेही वाचा - सांगवीच्या आसना नदीवरील नविन पुलाने वाहतूकीची कोंडी फुटणार, पालकमंत्री अशोक चव्हाण करणार शुक्रवारी भूमीपुजन

विद्युतदाहिनीच्या जागेची पाहणी
गोवर्धनघाट शांतीधाम येथील नवीन विद्युतदाहिनीच्या कामाची पाहणी महापौर सौ.मोहिनी येवनकर, आयुक्त सुनील लहाने यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अमितसिंह तेहरा, काँग्रेस कोषाध्यक्ष विजय येवनकर, शांतीधाम समितीचे हर्षद शहा, प्रकाश मुथा आदींची उपस्थिती होती.

हेही वाचलेच पाहिजे - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी मोर्चे बांधणी; बी. आर. कदम, बाबुराव कोंढेकर, प्रवीण देशमुख, डाॅ इंगोले यांची नावे चर्चेत

तुप्पा येथे खतनिर्मिती प्रकल्प
तुप्पा येथील घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत उभारण्यात येणार्‍या खतनिर्मिती प्रकल्पासही महापौर सौ.मोहिनी येवनकर, आयुक्त सुनील लहाने, स्थायी समितीचे माजी सभापती अमितसिंह तेहरा, गिरीश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. नवीन विद्युतदाहिनी व खतनिर्मिती प्रकल्प कामाच्या प्रगतीचा आढावा घेत कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश महापौर मोहिनी येवनकर यांनी संबंधितांना दिले आहेत.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळाव्याचे आयोजन
नांदेडला “विकेल ते पिकेल” या धोरणांतर्गंत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा कृषि विभागामार्फत ता. २६ ते ता. २९ जानेवारी या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित केला आहे. या मेळाव्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फळे व भाजीपाला, विविध सेंद्रीय उत्पादने, गहु, ज्वारी, तांदुळ इत्यादी धान्य, तुर, मुग, उडीद इत्यादी डाळी, हळद, मिरची पावडर इत्यादी मसाले, लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रीय गुळ, पाक, मध, विविध प्रकारचे पापड, लोणचे, चटण्या, शेतमालावर प्रक्रिया केलेले विविध पदार्थ इत्यादी शेतकऱ्यामार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवी चलवदे यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor of Nanded Electricity, Composting Project inspected by the Commissioner nanded palika news