esakal | यांत्रिकीकरण आले शेतमजुरांच्या मुळावर; नांदेडच्या अप्पारावपेठ शिवारात यंत्रांचा कब्जा

बोलून बातमी शोधा

पीक काढणी यंत्र

यांत्रिकीकरण आले शेतमजुरांच्या मुळावर; नांदेडच्या अप्पारावपेठ शिवारात यंत्रांचा कब्जा

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपुजे

शिवणी ( जिल्हा किनवट ) : किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ परिसरात बऱ्यापैकी सिंचनाची सोय असल्याने या परिसरात पावसाळी, हिवाळी, उन्हाळी अशी तीन पिके घेतली जातात. गेल्यावर्षी या परिसरात मका पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले होते. ती काढणी झाल्यानंतर लाँकडाऊन लागल्यामुळे मका पीक कुठे विकावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता. तर दुसरीकडे शेतमजूरांच्या हाताला लागणारे काम शेतकरी यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने एकप्रकारचे शेतमजुरांवर गंडातर आले आहे.

त्यातच केंद्र सरकारकडून मका ज्वारी खरेदी करण्याचा आदेश आल्यामुळे उशिरा का होईना आपला शेतीमाल ज्वारी, मका विक्री होणार त्यामुळे समाधानी होते. या वर्षी या भागातील शेतकरी मका पीक कमी करुन ज्वारीकडे वळला. पीकही चांगल्याप्रकारे आले. ज्वारी पीक काढणीला आले. अशातच पावसाळा जवळ येत असल्याने या जमिनीची उन्हाळी मशागत न झाल्याने अप्पाराव पेठ येथील शेतकरी विनायक देशमुख यांनी आपल्या चार एकर शेत जमिनीत ज्वारीच्या पिकाची पेरणी केली.

हेही वाचा - सेनगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी दिला नकार; शेवटी मुख्याधिकाऱ्याने दिला मुखाग्नी

ज्वारी काढणी करण्यासाठी या भागात कोरोना संसर्गामुळे मजूर मिळत नसल्याने दोन- तीन गावातील मजुराकडे भेटी दिल्या पण मजूर मिळत नसल्याचे पाहून या शेतकऱ्याने अखेर हार्वेस्टरने ज्वारी काढण्याचे ठरवले. चार एकर ज्वारीपासून जनावरांसाठी लागणारा कडबा जवळपास तीन हजार निघत होता. हा कडबा विक्री केला असता तर शेतकऱ्याला कडब्यापासून जवळपास 40 हजार रुपये मिळाले असते. ते नुकसान सहन करुन या शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साह्याने ज्वारी काढणी केल्याचे सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे