
कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन व जमावबंदी लागू होण्याने याचा फटका पोटासाठी स्थलांतरित झालेल्या या गरीब कुटुंबांना बसला. हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली. यामुळे हे कुटुंबीय मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतली. पण गावात आल्यानंतर त्यांना शाळेत क्वारंटाइन व्हावे लागल्याने आपल्या कुटुंबीयांना आपण कसे खाऊ घालणार या विवंचनेत या कुटुंबातील प्रमुख महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याने या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.
घोगरी, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः शेती असूनही नसल्यागत मजुरीवर उदरनिर्वाह करणारे घोगरी (ता. हदगाव) येथील एक गरीब कुटुंब. दूर शहरात गेल्यास जास्त मोलमजुरी मिळेल या भोळ्या आशेने ‘मायानगरीत’ सदर कुटुंब स्थलांतरित झाले खरे, परंतु कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन व जमावबंदी लागू होण्याने याचा फटका पोटासाठी स्थलांतरित झालेल्या या गरीब कुटुंबांना बसला. हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली. यामुळे हे कुटुंबीय मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतली. पण गावात आल्यानंतर त्यांना शाळेत क्वारंटाइन व्हावे लागल्याने आपल्या कुटुंबीयांना आपण कसे खाऊ घालणार या विवंचनेत या कुटुंबातील प्रमुख महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याने या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.
हंगाम संपताच सदर कुटुंबाने मुंबई गाठली
येथील रहिवासी वामन लक्ष्मण कदम हे १२ बलुतेदारांपैकी एक असून त्यांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आता कालबाह्य झाल्याने शासनाच्या वतीने त्यांच्या वडिलांना गायरान जमीन मिळाली. ही जमीन असून नसल्यागत असल्याने त्यांना नाईलाजाने मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत असे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून या परिसरात निसर्गाची अवकृपा होण्याने, हाताला काम मिळत नसल्याने, शिवाय दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च झेपावत नसल्याने व मुलीच्या लग्नाची चिंता वाढल्याने कुठेतरी दूर शहरात कामानिमित्त स्थलांतरित झाल्यास जास्त मजुरी मिळेल या भोळ्या आशेने खरीप हंगाम संपताच सदर कुटुंबाने मुंबई गाठली.
हेही वाचा - फुलांच्या वर्षावाने काेरोनामुक्त रुग्णास सुटी
गावात येतात बाहेरगावाहून आलेले म्हणून विलगीकरण करण्यासाठी त्यांना शाळेत पाच ते सहा दिवसांपासून क्वारंटाइन व्हावे लागले आहे. यामुळे हाताला काम नाही, केलेली कमई पूर्णपणे मातीमोल गेली. शिवाय हातात पैसा नाही, कुटुंबीयांची खाण्यावाचून होत असलेली परवड पाहून आता काय खाऊ घालावे? पावसाळा लागल्यानंतर कुटुंबाची किती हाल होतील, या विवंचनेत कुटुंबप्रमुखाची पत्नी पार्वतीबाई कदम या रात्रंदिवस विचार करू लागल्यानेच त्यांचे गेल्या दोन दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडले आहे. गावचे भूमिपुत्र तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील घंटलवार, संजय वानोळे, सरपंच विश्वंभर पुठेवाड यांच्या पुढाकारातून त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.