esakal | Breaking: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक
sakal

बोलून बातमी शोधा

ashok chavan

घटनेनंतर चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या नांदेडमधील आनंद निलयम या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अज्ञात महिलेने येऊन घरासमोर दगडफेक केली आहे. त्यानंतर तत्काळ शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. पण तोपर्यंत महिला तिथून पसार झाली होती. सध्या पोलिस याबद्दलचा अधिकचा तपास करत आहेत. दगडफेकीच्या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत.

loading image
go to top