नांदेड - जुन्या वैमनस्यातून २५ वर्षीय युवकाचा फरशी व दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुन्या नांदेड भागातील पैलवान टी-हाऊससमोर घडली. सक्षम गोविंद ताटे (वय २५, रा. मच्छी मार्केट, संघर्षनगर) असे मृताचे नाव आहे.