शेतकऱ्यांसाठी आमदारांनी घतेला हा निर्णय !

गजानन पाटील
Thursday, 4 June 2020


आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर व तहसीलदार जिवराज डापकर यांच्याशी चर्चा करून नगरपालिकेला व प्रशासनाला सूचना केल्यामुळे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय नगरपालिकेने आज घेतला. त्यामुळे बुधवार (ता. तीन) पासून हदगाव शहरातील दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती मुख्याधिकारी विजय येरावाड यांनी दिली.

हदगाव, (जि. नांदेड) ः हदगाव शहरातील दुकाने सध्या दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत होती. परंतु, आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर व तहसीलदार जिवराज डापकर यांच्याशी चर्चा करून नगरपालिकेला व प्रशासनाला सूचना केल्यामुळे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय नगरपालिकेने आज घेतला. त्यामुळे बुधवार (ता. तीन) पासून हदगाव शहरातील दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती मुख्याधिकारी विजय येरावाड यांनी दिली.

शहरातील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी
चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही मर्यादित दुकानांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सर्वत्र याची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु, हदगावची बाजारपेठ फक्त दोन वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय हदगाव नगरपालिकेने घेतलेला होता. लॉकडाउनमध्ये परवानगी असलेली दुकाने सर्वत्र पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश असताना मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हदगावात दोन वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी दिल्या असल्याचे सांगत नगरपालिकेने शहरातील दवाखाने व औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने दुपारी दोन वाजता बंद केली पाहिजेत, असा आदेश जारी केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी केली. परंतु, पेरणीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी खत, बियाणांची जमवाजमव करण्यासाठी शहरातील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी केली होती.

 

हेही वाचा -  हिंगोलीत नऊ हजार मजुरांच्या हाताला काम -

सर्व बाजारपेठ सुरू ठेवण्याच्या सूचना
शेतकऱ्यांनी या बाबतच्या तक्रारी आमदार माधव पाटील जळगावकर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना या बाबत अडवणूक करू नये, अशा सूचना केल्या होत्या. परंतु, दोन वाजेपर्यंत खत, बियाणे, कृषी अवजारे व इतर सामानाची खरेदी शक्य होत नसल्यामुळे पुरेसा वेळ मिळावा व मर्यादित वेळेमुळे होणारी गर्दी टाळता यावी, यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पाच वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ सुरू ठेवण्याच्या सूचना जळगावकर यांनी दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्र्यंबक पाटील हडसनीकर, माजी नगराध्यक्ष अमित अडसूळ, अहमद पटेल, स्वीय सहायक अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mla Jvalgavkar Decide A Good Design For Farmer, Nanded News