सोमवारी ७४ अहवाल पॉझिटिव्ह, २३५ रुग्ण कोरोनामुक्त ः एकाचा मृत्यू 

शिवचरण वावळे
Monday, 12 October 2020

सोमवारी (ता.१२) ५१० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातीलकोरोना बाधिक रुग्णांची संख्या १७ हजार ४९४ वर पोहचली आहे.

नांदेड - जिल्ह्यातील वाढलेले पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यासोबतच मृत्यूचा वाढलेला दर हा जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची मोठी डोकेदुखी ठरली होती. आठवडाभरापासून पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यू संख्येत मोठी घट झाली आहे. सोमवारी (ता.१२) प्रयोग शाळेकडून ५१० प्राप्त अहवालापैकी ४२७ निगेटिव्ह, ७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, २३५ जण कोरोनामुक्त आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

प्रयोगशाळेत रविवारी (ता.११) ७०६ अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी सोमवारी (ता.१२) ५१० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातीलकोरोना बाधिक रुग्णांची संख्या १७ हजार ४९४ वर पोहचली आहे. विजयनगर सिडको येथील पुरुष (वय ६६) यांच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- तीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू

सोमवारी दिवसभरात एकाचा मृत्यू

आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची मृत्यूची संख्या ४५७ दहा दिवसांच्या उपचारानंतर रविवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- नऊ, जिल्हा रुग्णालय- सहा, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील १५७, धर्माबाद- आठ, मुखेड- २८, हदगाव- एक, कंधार- पाच, देगलूर- दोन, नायगाव-पाच व खासगी रुग्णालयातील १५ असे २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत १४ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रविवारी तपासणीसाठी घेतलेल्या अहवालात नांदेड महापालीका क्षेत्रात- ४२, नांदेड ग्रामीण- तीन, भोकर-चार, लोहा-दोन, माहूर-दोन, बिलोली-एक, कंधार-तीन, किनवट-पाच, हिमायतनगर-एक, हदगाव-एक, मुखेड-एक, मुदखेड-एक, नायगाव-चार, हिंगोली-एक, यवतमाळ-दोन असे ७४ कोरोना बाधित नव्याने आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ४९४ इतकी झाली आहे. सध्या दोन हजार २९५ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर अन्य घटनेत दोघांचा मृत्यू ​

तिन्ही शासकीय रुग्णालयात २१२ खाटी शिल्लक

सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात- १३४, जिल्हा रुग्णालयात- ६१, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमध्ये एक हजार १९, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत- ५१, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय- आठ, नायगाव- ४५, बिलोली- २८, मुखेड-४८, मांडवी-१३, देगलूर- आठ, लोहा- २९, हदगाव- २९, भोकर- १६, बारड- चार, मुदखेड-११, माहूर- ११, किनवट-४१, धर्माबाद- २३, उमरी-४९, कंधार- १४, अर्धापूर-२४, खासगी रुग्णालय-२१८, लातूर संदर्भित- चार, निजामाबाद-चार, आदिलाबाद- दोन आणि परभणी येथे एक असे दोन हजार २९५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात ७३, जिल्हा रुग्णालयात-८५, आयुर्वेदिक रुग्णालयात ५४ खाटा शिल्लक आहेत. 

कोरोना मीटर ः 

सोमवारी पॉझिटिव्ह- ७४ 
सोमवारी कोरोनामुक्त-२३५ 
सोमवारी मृत्यू- एक 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १७ हजार ४९४ 
एकूण कोरोनामुक्त- १४ हजार ६३२ 
एकूण मृत्यू- ४५७ 
उपचार सुरू- दोन हजार २९५ 
गंभीर रुग्ण- ४३ 
प्रलंबित अहवाल- ३३२ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monday 74 report positive 235 patients coronary free Death of one Nanded News