esakal | नांदेड : रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर अन्य घटनेत दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हा अपघात इल्द भारत कंपनीसमोर मुखेड ते नरसी रस्‍त्यावर ता. नऊ आॅक्टोबर रोजी झाला होता. तसेच दुसऱ्या घटनेत एका युवकाचा झाडावरुन पडून मृत्यू झाला.

नांदेड : रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर अन्य घटनेत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : तालुक्याच्या ठिकाणाहून मुळगावी जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास रानडुकराने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात इल्द भारत कंपनीसमोर मुखेड ते नरसी रस्‍त्यावर ता. नऊ आॅक्टोबर रोजी झाला होता. तसेच दुसऱ्या घटनेत एका युवकाचा झाडावरुन पडून मृत्यू झाला. ही घटना हडको नांदेड येथे ता. १० आॅक्टोबर रोजी घडली. 

कर्णा (ता. मुखेड) येथील शिवाजी गणपत सोमवारे (वय ४०) हे आपल्या एका सहकाऱ्यासह दुचाकी (एमएच२६-एए-२२२३) वरुन कामनिमित्त मुखेडला आले होते. दिवसभर आपले काम करुन सायंकाळी वरील क्रमांकाच्या दुचाकीवरुन ते आपल्या सहकाऱ्यासह आपल्या कर्णा या गावी निघाले. त्यांची दुचाकी इल्द भारत कंपनीसमोर येताच रस्त्याच्या झुडपातून रस्ता ओलांडणाऱ्या रानडुकराची दुचाकीला जबर धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील शिवाजी सोमवारे हा गंभीर जखमी झाला. तर त्याता साथिदार किरकोळ जखमी झाला. जखमी शिवाजी याला मुखेड येथे प्राथमीक उपचार करुन नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा नांदेडमध्ये ‘रिंदा’ गॅंग पुन्हा सक्रीय, दोघांवर गुन्हा दाखल -

रानडुकराच्या धडकेत दुचाकीचेही मोठे नुकसान

रुग्णालयात उपचार सुरु असतांना शिवाजी सोमवारे याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती गणपत सोमवारे यांनी मुखेड पोलिसांना दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक श्री. माडपते करत आहेत. रानडुकराच्या धडकेत दुचाकीचेही मोठे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

झाडावरुन पडून एकाच मृत्यू 

नांदेड शहरापासून जवळच असलेल्या हडको शिवारात एका झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कथक ज्ञानोबाराव ढवळे (वय ३१) हा ता. १० आॅक्टोबरच्या सांयकाळी साडेपाचच्या सुमारास गेला होता. त्याचा तोल गेल्याने खाली पडला व जखमी झाला. त्यालाही विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात संदीप ढवळे यांच्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार श्री. गिते करत आहेत.   

येथे क्लिक करानांदेडला वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात

दुचाकीच्या धडकेत मृत्यू 

कंधार येथील झारे गल्ली भागात राहणारा शेख मोहमद शेख रहीम (वय ५८) यांना समोरुन येणाऱ्या दुचाकी ( एसएच २६-बीएच- ८८२२) च्या चालकाने जोराची धडक दिली. हा अपघात नांदेड- लातुर रस्त्यावर नंदी हॉटेलसमोर, लोहा परिसरात ता. १० आॅक्टोबर रात्री दहाच्या सुमारास झाला. यात शेख मोहमद हा गंभीर जखमी होऊन विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार श्री. राठोड करत आहेत.