साडेपाचशेहून अधिक एसटी बस सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बस

साडेपाचशेहून अधिक एसटी बस सुरू

नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटी महामंडळातील कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होण्यास सुरूवात झाली असून मागील दोन आठवड्यात नांदेड विभागात एक हजार ४७८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यात ५९८ चालक आणि ५९० वाहकांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रवाशांना सेवा देण्यासही प्रतिसाद मिळत असून विभागात ५९८ एसटी बस सुरु झाल्या आहेत.मध्यंतरीच्या काळात दोन वर्षात कोरोना काळात वाहतुक सेवा ठप्प झाली होती. दरम्यानच्या काळात एसटी महामंडळाचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर बसने शाळेत जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांचे देखील नुकसान झाले तसेच प्रचंड हालही झाले. त्यातच एसटी कर्मचारी यांना राज्य शासनात विलनीकरणाच्‍या मागणीसाठी संप सुरु केल्याने एसटीचे पुन्हा मोठे नुकसान झाले. अनेक वेळेस विनवण्या करुनही कर्मचारी कामावर परत येत नव्हते. त्यामुळे एसटी महामंडळाचे काय होणार? हा अनेकांना प्रश्न पडला होता.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करुन संपाची हवा काढून घेतली. त्याचबरोबर अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे देखील डोळे उघडले. त्यानंतर राज्यभरातील संपावर असलेले एसटी कर्मचारी कामावर येण्यास सुरुवात झाली. बसची संख्या वाढल्याने उन्हाळ्याच्या सुटींची मजा घेण्यासाठी प्रवासाचा बेत आखलेल्या बालक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. सध्या रेल्वेस्थानक व बसस्थानकात देखील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यातुन एसटी आणि रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

नऊ आगारात बससेवा सुरू

नांदेड विभागातील एकुण दोन हजार ९१२ कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार ५८ कर्मचारी कामावर प्रत्यक्ष हजर झाले आहेत. साप्ताहितक सुटी, रजा व दौऱ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५३२ इतकी आहे. ९३ कर्मचारी आजही कामावर गैरहजर आहेत तर २३६ कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आले आहे. कर्मचारी संख्या वाढल्याने नांदेडच्या मुख्य आगारातुन ९७, कंधारला ९७, मुखेडला ९१, देगलूरला ७७, बिलोलीला ६१, हदगावला ६०, भोकरला ५५, किनवटला ४४ व माहूर आगारातून १६ अशा एकूण ५९८ एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या एसटी महामंडळातील केवळ ३२२ कर्मचारी अजूनही कामावर रुजू झाले नसल्याने त्यांचा संपात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: More Than 550 St Bus Started In Nanded Division

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top