सकाळी हादरा सायंकाळी दिलासा : चौघांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारी (ता.१७) सकाळी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असताना त्याच दिवशी दुपारी पंजाब भवन येथे उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णास कोरोनाची लक्षणे नसल्याने व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे चौघांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आने

सकाळी हादरा सायंकाळी दिलासा : चौघांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात एकिकडे कोरोनापॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेच्या नवीन नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास दहा दिवसापर्यंत कोरोनाची लक्षणे आढळुन आली नसल्यास त्यांना घरी सोडण्यात येत आहे. रविवारी (ता.१७) जिल्ह्यातील चार पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

रविवारी (ता.१७) सकाळी १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असताना त्याच दिवशी दुपारी पंजाब भवन येथे उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्णास कोरोनाची लक्षणे नसल्याने व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे चौघांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याने आरोग्य विभागासह नांदेडकरांना दिलासा मिळत आहे. यापूर्वी देखील २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

हेही वाचा- रुग्णाच्या जिवाची किंमत पैशात न मोजणारा देवदूत...

आत्तापर्यंत ३० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज
सध्या जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या ९७ वर पोहचली असून, त्यांच्यावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, पंजाब भवन, एनआरआय यात्री निवास तसेच बारड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरु असून, ९७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आत्तापर्यंत पाच बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३० जणास घरी सोडण्यात आले आहे. दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अद्यापही बेपत्ता असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हेही वाचा- व्यापाऱ्यांना दिलासा - नांदेडला अशी सुरु राहणार दुकाने...

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
-आत्तापर्यंत एकूण संशयित - दोन हजार ५२६
-एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- दोन हजार २७९
-क्वारंटाईन कालावधी पूर्ण - ९८२
-अजून निरीक्षणाखाली असलेले - २१२
-पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -३२
-घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - दोन हजार २४७
-एकुण नमुने तपासणी- दोन हजार ५५०
-एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- ९७
-पैकी निगेटिव्ह - दोन हजार ३०२
-नमुने तपासणी अहवाल बाकी- ३०
-नाकारण्यात आलेले नमुने - १४
-अनिर्णित अहवाल – १०४
-कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – पाच
-जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी एक लाख १६ हजार १९२ राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत 

loading image
go to top