esakal | तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मृत्यूदर स्थिर, शनिवारी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ३७ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

शनिवारी एक हजार ८५१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यातील एक हजार ७४५ निगेटिव्ह, ७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजार ९२१ इतकी झाली आहे.

तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मृत्यूदर स्थिर, शनिवारी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ३७ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येक सतत वाढ होत आहे. शनिवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या अहवालात ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण दगावला नसल्याने जिल्ह्यातील मृत्यू दर स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे. 

दिवाळी संपताच कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.२०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शनिवारी एक हजार ८५१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यातील एक हजार ७४५ निगेटिव्ह, ७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजार ९२१ इतकी झाली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

हेही वाचा- नांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन ​

रुग्णांची मृत्यू संख्या ५४३ वर स्थिर

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या ५४३ वर स्थिर आहे. शनिवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - दोन, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - एक, महापालिकेच्या ताब्यातील एनआरआय भवन आणि गृह विलगीकरणातील - ३५, हदगाव- तीन, बिलोली - एक, मुखेड - एक, खासगी रुग्णालय - सहा आणि अकोला येथे संदर्भित करण्यात आलेला एक असे ३७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचले पाहिजे - कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतक-याची आत्महत्या

तीन दिवसात जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढली 

नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ४०, नांदेड ग्रामीण - एक, अर्धापूर - सात, बिलोली - एक, नायगाव - एक, कंधार - १४, हदगाव - तीन, लोहा- एक, किनवट - एक, देगलूर - एक, परभणी - एक आणि हिंगोली - एक असे ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९ हजार ९२१ वर पोहचली असून, आतापर्यंत १८ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१५ बाधितावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १६ कोरोना बाधिकांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. मागील तीन दिवसापासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढल्याने कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या एका टक्याने घसरली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत एक हजार ३४५ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर ः 

शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ७२ 
शनिवारी कोरोनामुक्त - ३७ 
शनिवारी मृत्यू - शुन्य 
एकूण पॉझिटिव्ह - १९ हजार ९२१ 
एकूण कोरोनामुक्त - १८ हजार ८६९ 
एकूण मृत्यू - ५४३ 
उपचार सुरु - ३१५ 
गंभीर रुग्ण - १६ 
स्वॅब प्रलंबित - एक हजार ३४५