आईनं जगाचा निरोप घेतला; धक्का सहन न झाल्यानं मुलाचाही मृत्यू

अमरनाथ कांबळे
Sunday, 24 January 2021

'आई म्हणुनी कोणी आईस हाक मारी, ही  हाक येई काणी मग मझ होई शोककारी' या उक्तीप्रमाणे आई व मुलाचे जिवापाड असलेल्या प्रेमाची प्रचिती दिसून आली आहे.

कुंडलवाडी (नांदेड) : येथील वंजारगल्ली येथील रहिवाशी बुधाबाई चिंनोजी गंगोने (वय 105) यांचे (ता.23) रोजी सायंकाळी चार वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून आपल्या मुलांचा सांभाळ करत मुलांना मोठे केले. आपलं संपूर्ण आयुष्य घरपणासाठी झिजवले आहे. मातेच्या निधनाचा विरह त्यांच्या मोठ्या मुलाला सहन न झाल्यामुळे त्यांचा मोठा मुलगा अशोक चिंनोजी गंगोने (वय 75) त्यांचेही त्याच दिवशी (ता. 23) रोजी सायंकाळी नऊ  वाजता ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झाल्याची धक्कादायक घटना वंजारगल्ली येथे घडली आहे.

औरंगाबादहून नांदेडकडे जाणारी कार पुलावरून कोसळून चार जण जखमी; औंढा नागनाथ जवळील घटना

'आई म्हणुनी कोणी आईस हाक मारी, ही  हाक येई काणी मग मझ होई शोककारी' या उक्तीप्रमाणे आई व मुलाचे जिवापाड असलेल्या प्रेमाची प्रचिती दिसून आली आहे. या घटनेची माहिती संपूर्ण शहरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आई व मुलाच्या पपार्थिवांवर (ता. 24) रोजी दुपारी एक वाजता नागणी रोडवर असलेल्या समशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. बुधाबाई गंगोने यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यातील मोठ्या मुलाचे निधन झाले आहे तर अशोक गंगोने यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A mother and child died on the same day at Kundalwadi

Tags
टॉपिकस
Topic Tags: