Motivational: मारो छाय मारो स्वप्न पुरु करो- कोण म्हणाले ते वाचा...?

file photo
file photo

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : घरात अठराविश्व दारिद्र्य, गरिबी ही पाचवीला पुजलेली, पारधी समाजात पिढीजात शिक्षणाचा गंध नसुनही उराशी जिद्द, अडाणी आई- वडीलांची प्रेरणा घेऊन कुठलीही खाजगी शिकवणी नाही. झोपडी वजा घरात राञंदिवस अभ्यास करून पार्डी (ता. हिमायतनगर) येथील पारधी समाजातील विठ्ठल ह्या विद्यार्थ्यांने इयत्ता बारावीच्या परिक्षेत ७७./५३ टक्के गुण घेवून घवघवीत यश संपादन केले आहे. 

शहरापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या गावकुसावर विठ्ठल शेकलाल राठोड या पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे कुटूंब. अनेक वर्षांपासून झोपडीत   वास्तव्याला आहे. भटंकती करत- करत विठ्ठलचे आजोबा हिरालाल सिताराम राठोड हे पार्डी गावात स्थिरावले. विठ्ठलचे वडील हे आपला पिढीजात व्यवसाय असलेला शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात, तर आई ही शेतात मजूरी करूण संसाराला हातभार लावते. घरात अठराविश्व दारिद्र्य असतांना देखील विठ्ठलने येथील राजा भगीरथ विद्यालयात कला शाखेत ७७./५३ टक्के गुण घेवून घवघवीत यश संपादन केल्याने तालुक्यात  सर्वञ त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या यशाने त्याचे कुटुंब भारावून गेले असून आता माझा मुलगा मोठा साहेब होईल म्हणून पारधी भाषेत '' मारो छाय मारो स्वप्न पुरु करो " अशी प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केली. 

पोलिसांचा डोळा याच समाजावर असतो

पारधी समाज म्हटले की, डोळ्यासमोर चित्र उभे राहते की, रानावनात भटंकती करणारा समाज समाजात शिक्षणाचा गंध नाही. इंग्रजांच्या काळापासून   समाजावर गुन्हेगारी चा शिक्का कुठेही चोरी, वाटमारी झालीही, पोलिसांचा डोळा याच समाजावर असतो. तरी माञ मुख्य प्रवाहापासुन दुर असलेला हा   समाज, हळुहळू का होईना मुख्यप्रवाहात येत असल्याचे चित्र विठ्ठलच्या रूपाने पहावयास मिळत आहे. असे कितीतरी विठल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येवून समाजाला प्रहावात आणतील. असे सध्यातरी विठ्ठलच्या रुपाने दिसून येत आहे. देश्याच्या कानाकोपर्‍यासह राज्यात पारधी समाजाची मोठी संख्या  आहे. ह्यात मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद तर विदर्भातील बुलढाणा व यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भात पारध्याच्या वस्त्या मोठया प्रमाणावर आहेत. विदर्भात पारध्याच्या वस्तीला बेडा असे म्हणतात. पारधी समाज मुख्य प्रवाहात यावा म्हणून अनेक सामाजिक संस्था अहोरात्र प्रयत्न करीत असताना शासनाचे माञ म्हणावे तसे सहकार्य लाभलेले नाही. विठ्ठलला दोन बहिणी असून दोघी पैकी मनिषा ही आठवीमध्ये दुसरी ज्योती दहाव्या वर्गात आहे, तर ऐक भाऊ बि. ए. फस्ट ईअरला असून आम्ही चौघेही भावंड मोठी शिक्षणात मजल मारूण ईतिहास घडवू असे ही विठ्ठलने सांगितले. 

याच कुटुंबाचा आदर्श भटक्या समाजाने घ्यावा

घरात शिक्षणाचा गंध नसतांना ऊन, वारा, पाऊस व काही हाल अपेष्टा सोसत गरिबीच्या याञेत चारही मुलांना शिक्षण देणारा पारधी समाजातील शेखलाल हा जिल्ह्यात दुर्मिळ समजावा. याच कुटुंबाचा आदर्श भटक्या समाजाने घ्यावा. व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे. असे मनोगत विठलचा भाऊ मोहन यांने व्यक्त केले. माझ्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक, आई, वडील आजोबा, यांना जाते असे विठल म्हणाला. 

सकाळने त्याच्या कुटुंबियांचा केला होता सत्कार

हिमायतनगर तालुक्यात भटक्या समाजाची संख्या ही नगण्य आहे. याच तालुक्यातून भटंकती करणा र्यावैधू समाजातील रघूने सन २०१८ मध्ये ८८ टक्के गुण घेवून घवघवीत यश संपादन केले होते. यावेळी दै. सकाळ ने १६ जून २०१८ रोजी रघूला मोठी प्रसिद्धी दिली होती. सकाळने एवढ्यावरच न थांबता नांदेडच्या यशवंत विद्यालयात त्यास प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली होती. तर सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त रघुची सकाळने दखल घेऊन रघु व त्याच्या आई, वडिलांचा स्मृती चिन्ह देवून गौरव केला होता. तर साईप्रतिष्टान नांदेड येथील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रघूला  पुढील शिक्षणासाठी अर्थिक मदतीचा हात दिला आहे. या वेळी सकाळ च्या आवाहनाला प्रतिसाद देत रघुच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती.

युपीएससी स्पर्धा परिक्षेंची तयारी करावयाची

पूढे भविष्यात युपीएससी स्पर्धा परिक्षेंची तयारी करावयाची असून ह्या परीक्षेतसुद्धा यश संपादन करून निश्चितच मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न असून    माझ्या समाजाला याच माध्यमातून भटक्या समाजाची सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे. 
- विठ्ठल शेखलाल राठोड.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com