esakal | Motivational story : कोरोनाने वडिलासह तिन काकांना हिरावले; मात्र डॉ. मसरतची रुग्णसेवा सुरुच

बोलून बातमी शोधा

डाॅ. नसरत
Motivational story : कोरोनाने वडिलासह तिन काकांना हिरावले; मात्र डॉ. मसरतची रुग्णसेवा सुरुच
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना काळात पीपीई किट घालून तासन् तास पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची अनेक रुपे समोर येत आहेत. नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील डॉ. मसरन सिद्धीकी यांचे वडिल, तीन काका कोरोनाने हिरावले. त्यांच्यावर दुखाचा डोंगर पडलेला असताना त्यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

डॉ. मसरत सिद्धीकी या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण डॉक्टर, परिचारिका यांच्या टिमला सांभाळण्यासोबतच कोरोना रुग्णांची देखील जबाबदारी आहेच. अनेक महिण्यांसून न थकता त्या मनापासून रुग्ण सेवा करत आहेत. दरम्यान त्यांच्या आई- वडीलांसह भाऊ, वहिणी आणि तीन काका यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर शर्थिचे उपचार सुरु होते. यात आई, भाऊ आणि वहिणी यांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली खरी. परंतु वडिलांसह तीन काकांचा कोरोनामुळे डोळ्यादेखत मृत्यू झाला.

हेही वाचा - यातील तिसरे आरोपी मात्र फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे

हा केवळ डॉ. मसरत यांच्यासाठीच नव्हे तर सर्व सिद्धिकी परिवारासाठी मोठा धक्का होता. परंतु वडिल गेल्याचे जास्त दु: ख करत बसण्यापेक्षा वडिलांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात आणायची होती. म्हणून डॉ. मसरत ह्या सर्व दु: ख बाजुला सारुन पुन्हा कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाल्या. कोरोना आजारी रुग्णांसमोर डोळ्यांच्या कडा ओलावल्या तरी त्या कधीच दाखवत नाहीत. उलट कोरोना रुग्णांची सेवा करताना त्यांना नेहमी वडिलांनी दिलेली प्रेरणा आठवत राहते. आणि वडिलांच्या प्रेरणेचे पंखात बळ घेऊन त्या पुन्हा रुग्णांची देखभाल करतात. अशा या धाडसी डॉ. मसरत सिद्धिकी यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे