esakal | खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले नांदेडला येणाार 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला मराठा आरक्षण स्थगितीचा जाब विचारला जाणार असून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशाही ठरविली जाणार आहे

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले नांदेडला येणाार 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात रविवार(ता. आठ) नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला मराठा आरक्षण स्थगितीचा जाब विचारला जाणार असून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशाही ठरविली जाणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्रदादा पाटील हे राहणार असून कार्यक्रमाचे उद्‌घाटन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील, सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक सुभाष जावळे, रमेश पाटील केरे, डॉ. संजय लाखे पाटील, विनायक भिसे पाटील, गंगाधर काळकुट्टे, सज्जन सोळंके, राजकुमार पा.सूर्यवंशी, अ.भा. छावाचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुडेकर, अ.भा. छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, छावा क्रांतीवीर सघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीषभाऊ जाधव, मराठा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मनीष वडजे, राष्ट्रीय मराठा सेवासंघाचे तेलंगणा राज्यप्रभारी प्रा. डॉ. गणेश शिंदे, छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा. डॉ. रेणुकाताई मोरे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नेत्रसहायक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गजानन माने, छावा श्रमिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष भास्कर हंबर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा - तलाठी असलेल्या बापाने पुसले लेकीचे कुंकू : असे काय होते कारण ? 

या कार्यक्रमास सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्या समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम यांनी केले आहे. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी डॉ. बालाजी पेनूरकर, विलास पा. इंगळे, मंगेश पा. कदम, प्रशांत पा. मुळे, विजय पा. कदम, सुनील पा. कदम, गणेश पा. काळम, शिवाजी पा. जाधव, बालाजी कऱ्हाळे, तिरूपती पा. भगनुरे, बाला पा. कदम, हनमंत पा. वाडेकर, किरण पा. गव्हाणे, शैलेश पाटील, गणेश पा.कल्याणकर, वैभव पा .राजूरकर, प्रकाश पा. घोगरे, शुभम पावडे, अनिल पा.तेलंग, नवनाथ पा.जोगदंड आदी परिश्रम घेत आहेत.

loading image