खासदार चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 13 August 2020

यापूर्वी खा. चिखलीकर यांची केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड करण्यात आली आहे.

नांदेड : खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड करण्यात आली. यापूर्वी खा. चिखलीकर यांची केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड करण्यात आली आहे.   

खा. चिखलीकर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चौथ्यांदा मोठी जबाबदारी सोपविली आहे.

महत्वाच्या अशा समित्यांवर खासदार चिखलीकर यांची निवड

महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची  लोकप्रियता आणि त्यांच्या धाडसी नेतृत्वाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांच्याबद्दल दांडगी प्रतिष्ठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मधील अत्यंत महत्वाच्या अशा समित्यांवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यापूर्वीही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाच्या अशा समित्यांवर खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा -  या भागात ‘कंटेनमेंट झोन’ उठवूनही बॅरिकेट्स कायम

केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे

 यात रसायन व उर्वरक संसदीय स्थायी समिती,  ,इस्पात मंत्रालयाच्या परमार्शदात्रि समिती आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॕस मंत्रालयाच्या  समित्यांवरती खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आलेली आहे .आता विशेष बाब म्हणून देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवरही खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे खा. चिखलीकर यांच्यावर आता केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.या समितीचे  अध्यक्ष केंद्रीय श्रम व रोजगार  मंत्री संतोषकूमार गंगवार हे असून या समितीत केंद्रीय मंत्री अर्जूनराम मेघवाल व व्ही मूरलीधरन यांचा समावेश असून या महत्त्वाच्या समितीवर खा.प्रतापराव पाटील यांची नियूक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Chikhlikar on the committee of the Union Ministry of Labor and Employment nanded news