महावितरण : देखभाल दुरूस्तीसाठी एक गाव-एक दिवस अभियान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

महावितरणच्या कोवीड यौद्यांनी केला एकाच दिवशी अनेक समस्यांचा निपटारा, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही सहभाग.

नांदेड : महावितरणच्या कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर पावसाळापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे सर्वत्र अंतीम टप्प्यात सुरू आहेत. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून एखाद्या गावात देखभाल दुरूस्तीची सर्व कामे एकाच दिवशी पुर्ण व्हावीत या हेतूने नांदेड परिमंडळाच्या वतीने " एक गाव-एक दिवस " हे विशेष अभियान भोकर व नांदेड ग्रामीण विभागातील तीन गावामध्ये आज राबविण्यात आले. इतर कोवीड यौध्याप्रमाणेच महावितरणचे कर्मचारीही एखद्या यौध्याला साजेसे काम करत सर्व प्रकारची काळजी घेत अभियान यशश्वीपणे राबविण्यासाठी कार्यरत आहेत.

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता डी. व्ही. पडळकर यांच्या संकल्पनेतून नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये एक गाव- एक दिवस हे विशेष अभियान पुन्हा राबविण्यास आज पासून सुरवात करण्यात आली आहे.

हेही वाचा -  पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करु नये.....कोण म्हणाले ते वाचा

किनवट उपविभागातील बिलोरी या गावामधे 

भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड यांच्या सुचनेनुसार किनवट उपविभागातील बिलोरी या गावामधे उपकार्यकारी अभियंता श्री परचाके यांनी सकाळी गावामध्ये जावून या विशेष अभियाना अंतर्गत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठीच एक गाव-एक दिवस या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगत देखभाल दुरूस्तीच्या प्रत्यक्ष कामास सुरवात केली. यामध्ये प्रामुख्याने डीपीवरील कीटकॅट व केबलची दुरूस्ती, गावातील खराब झालेले पोल बदलणे, लोंबकळणाऱ्या तारा ओढणे, गावात झालेल्या अपघात प्रवण ठिकाणाची दुरूस्ती, शेतातील वाकलेले पोल सरळ करणे अशा कामांचा समावेश होता. बिलोरी सोबतच हदगाव उपविभागातील हरदाफ या गावामधेही सदरील कामे करण्यात आली.

मुदखेड उपविभागातील सरेगाव

भोकर विभागासोबतच नांदेड ग्रामीण विभागातील मुदखेड उपविभागातील सरेगाव या गावामधेही एक गाव-एक दिवस अभियान राबविण्यात आले. यासाठी कार्यकारी अभियंता श्याम दासकर तसेच उपकार्यकारी अभियंता स्नेहा हंचाटे यांनी परिश्रम घेत अभियान राबविले. यामधे गावातील समस्यांसोबतच शिवारातील लोंबकळणाऱ्या तारा, वाकलेले पोल दुरूस्त करणे अशा प्रकारची कामे प्रामुख्याने करण्यात आली.

येथे क्लिक करानांदेडमध्ये जावयाने सासुचे का फोडले डोके...? वाचा

थकीत व चालू वीजबील भरावे 

एक गाव एक दिवस हे अभियान पुढील किमान देान महिणे सुरू राहणार असून वीजगाहकांनी दुरूस्तीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यास सहकार्य करावे. त्याचबरोबर आपले थकीत व चालू वीजबील भरावे असे आवाहन मुख्य अभियंता डी.व्ही.पडळकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL: One Village One Day Campaign for Maintenance and Repair nanded news