नांदेडमध्ये जावयाने सासुचे का फोडले डोके...? वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

सासुचे डोके फुटले असून हातालही जबर दुखापत झाली आहे. ही घटना वसरणी येथील आकाशवाणी परिसरात ता. ३१ मे रोजी घडली होती.

नांदेड :  मुलीला व नाताला का मारत आहात असे म्हणून वाद मिटविणाऱ्या सासुलाच जावयाने मारहाण केली. यात सासुचे डोके फुटले असून हातालही जबर दुखापत झाली आहे. ही घटना वसरणी येथील आकाशवाणी परिसरात ता. ३१ मे रोजी घडली होती. मात्र उपचारानंतर सोमवारी (ता. आठ) रात्री उशिरा जावयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

वसरणी येथील आनंद उर्फ कांडा नामदेव सोनकांबळे हा आपल्या परिवारासाह राहतो. त्याची सासुरवाडीही जवळच आहे. तो नेहमी आपल्या पत्नीशी वाद घालत असे. त्यामुळे त्याला समज देण्यासाठी सासु आपल्या मुलीच्या घरी गेली. मुलीला व नाताला का मारता असे म्हणून जावयाला समजावून सांगत होती. यावेळई तु मला सांगणी कोणे म्हणून त्याने सासुवरच हल्ला चढविला. यात डोक्यावर दागड मारून डोके फोडले. तसेच काठीने हाताला जबर दुखापत केली. तिने विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालय व त्यानंतर घाटी रुग्णालय औरंगाबाद येते उपचार करून परत आली. सोमवारी (ता. सात) रात्री उशिरा नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात जावून जावई आनंद सोनकांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. सूर्यवंशी करत आहेत. 

हेही वाचाखासगी बस मालकांच्या काय आहेत मागण्या...?

वराह धरण्याच्या कारणावरून तलवारीने हल्ला

नांदेड : आमच्या गल्लीतील डुकरं का पकडता असे म्हणून चार जणांनी वाद घालून चक्क तलवारीने एकाच्या मानेवर जबर वार केला. सुदैवाने तो वार हातवर झेललेल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना चंदासिंग कॉर्नरपरिसरात रविवारी (ता. सात) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती असी की, रवी लक्ष्मण वाघमारे (वय ३५) रा. बळीरामपूर हा आपल्या भाच्यासह चंदासिंग कॉर्नर परिसरात करे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे त्यांच्याशी गोविंद कॉलनी सिडको येथील जितूसिंग टाक, रंजीतसिंग टाक, सुखासिंग टाक आणि जितुसिंगचा भाचा यांनी संगनमत करून वाद घातला. आपच्या परिसरात येऊन डुकरं का पकडता असे म्हणून रवी वाघमारे याला मारहाण केली.

येथे क्लिक करा -  Video : यंदाचा गणेशोत्सव संकटात, मूर्तिकार अडचणीत

चारजणावर प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल

जितूसिंग टाक याने आपल्या जवळील तलवारीने रवी वाघमारेच्या मानेवर वार केला. परंतु तलवारीचे तो वार चुकवून त्याने हातावर झेलला. यात त्याच्या हाताच्या पंजाला जबरदस्त मार बसला. जखमी रवि वाघमारे याला लगेच त्याच्या भाच्याने विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. रवी वाघमारे याच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात जितुसिंग टाक, रंजितसिंग टाक, सुखासिंग टाक आणि लखनसिंग या चारजणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. थोरात करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Nanded's son-in-law break his mother-in-law's head Read on nanded crime news