मुदखेड केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत "सीआरपीएफ खेलो इंडिया"

file photo
file photo

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड येथील सिआरपिएफच्या केंद्रीय प्रशिक्षण केंद्रामध्ये ता.२९ रोजी "राष्ट्रीय क्रीडा दिन" मोठया ऊत्सासाहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन सिआरपिएफचे पोलिस महानिरिक्षक श्री.राकेश कुमार यादव हे उपस्थीत होते,

यावेळी राकेश कुमार यादव यांनी उपस्थित जवान, अधिकारी व खेळाडू यांना खेळा विषयी व “सीआरपीएफ खेलो इंडिया आज भारत सरकार आणि डायरेक्टरेट जनरल, सीआरपीएफ, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संपूर्ण देशात खेळांचे आयोजित केले असल्याचे सांगीतले. 

हेही वाचा -  श्री चक्रधर स्वामी द्विज गोरक्षण तीर्थस्थानावर हव्यात मूलभूत सुविधा...  
आरोग्य खेळाच्या माध्यमातून चांगले आणि स्थिर

देशात आजच्या दिवशी राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा का केला जातो या विषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ता.२९ ऑगस्ट रोजी क्रिडा दिवस साजरे करण्याचे एक खास कारण आहे आज, महान, प्रतिभावान हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहरात झाला. ध्यानचंद यांनी क्रीडा जगात आपले आणि आपल्या देशाचे नाव उंचावले होते आपल्या देशासाठी अनेक सुवर्ण पदके जिंकली आहेत ध्यानचंद यांनी आपल्या करिष्माई कामगिरीने संपूर्ण जगाला चकित करुन सोडले होते आणि खेल जगतात इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात त्यांचे नाव नोंदविले गेले  आपले आरोग्य खेळाच्या माध्यमातून चांगले आणि स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.  यावेळी प्रमुख पाहुणे राकेशकुमार यादव यांच्या हस्ते दुपारी २ वाजता सीआरपीएफ "खेलो इंडिया" अंतर्गत व्हॉलीबॉल सामनाच्या  तीन स्पर्धा खेळवल्या गेल्या. या वेळी स्पर्धेत खेळणाऱ्या ळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी प्रेक्षक म्हणुन  उपस्थित असलेल्या सर्व जवानांनी प्रोत्साहन दिले.  

स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे

सदरील सामना संपल्यानंतर सर्व सहभागींना सीआरपीएफचे “खेलो इंडिया” प्रमाणपत्र मुख्य अतिथींच्या हस्ते देण्यात आले. पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी कोविड -१९ बद्दल सांगितले की, आज संपूर्ण देश कोविड -१९ च्या समस्येवर झगडत आहे. संरक्षणासंदर्भात चालू असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण जवान व अधिकाऱ्यांनी करावे. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे असेही आवाहन केले.

मास्क वापरुन उपस्थित होते

यावेळी प्राचार्य तथा कमांडन्ट  लीलाधर महारानींया, डेपोटीकमांडंट पुरुषोत्तम जोशी, उप कमांडन्ट  समीर कुमार राव, जगन्नानाथ उपाध्याय, साहाय्यक कमांडन्ट रुपेश  कुमार, पुरुषोत्तम राजगडकर, अंत्ये सह अधीनस्थ अधिकारी, जवान सामाजिक अंतर ठेऊन मास्क वापरुन उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com