अनुभवाच्या शिदोरीतून मुदखेड शहराचा विकास करणार- प्रशांत पाटील

आपल्या कार्यकाळात स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांची मिळालेली तत्पर साथ आपल्या कायम स्मरणात राहील अशी भावना आपला पदभार सुपूर्द करतांना तत्कालीन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी व्यक्त केली.
निरोप व स्वागत समारंभ
निरोप व स्वागत समारंभ

मुदखेड ( जिल्हा नांदेड ) : प्रत्येकाच्या जीवन प्रवासात समस्यांचा डोंगर हा येतोच. पण, त्यावर संयमाने आणि सावधगिरीने मात करणे हे गरजेचे असून नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहु. जनतेप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांना देखील पाठबळ देण्यासह शहराला वेगळ्या उंचीवर पोहचवू, असे सांगत कुटुंबाप्रमाणेच शहराची जबाबदारी खांद्यावर पेलून शहराला अनन्यसाधारण महत्त्व मिळवून देत आपल्या कर्तुत्व व अनुभवाच्या शिदोरीतून मुदखेड पालिकेचा विकास करणार असल्याची ग्वाही येथील नगरपालिकेचे नुतन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी तत्कालीन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम व आपल्या स्वागत समारंभाप्रसंगी बोलताना दिली.

कार्यक्रमाची सविस्तर भूमिका आपल्या प्रास्ताविकातून म.रा.न.प. कर्मचारी संघटनेचे प्रांत सरचिटणीस तथा लेखापाल रामेश्वर वाघमारे यांनी विषद केली.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते माधव कदम, नगरसेवक लक्ष्मणराव देवदे, नगरसेवक करीम खाँ साब, इम्रान मच्छीवाले, संजय आऊलवार, अॅड. कमलेश चौदंते, बबलू किराणावाले, चांदू चमकुरे, चांदु बोकेफोडे, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, उत्तमराव चव्हाण, अभियंता सुशील खिल्लारे, अभियंता कृष्णा कदम, कार्यालयीन अधीक्षक आजीम, दिलीप पवार, मो. युनूस , मोहन कवळे, मिसबाह सिद्दिकी, मानसिंग राठोड, रमेश सावंत , पिराजी जगताप यांच्यासह अन्य नगरपालिका कर्मचारी व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास साडेआठ लाख रुपयांची बॅग दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून जबरीने चोरली म्हणून पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीची सत्यता पडताळणी केली असता कांही मिनिटातच हा प्रकार उघड झाला.

आपल्या कार्यकाळात स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांची मिळालेली तत्पर साथ आपल्या कायम स्मरणात राहील अशी भावना आपला पदभार सुपूर्द करतांना तत्कालीन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुदखेड तालुका पत्रकार संघ व महाडिजिटल मिडीया असोसिएशनच्या च्या वतीने संजय कोलते, आतिक अहेमद, धम्मदाता कांबळे, मनोज कमटे, शेख शमशोद्दीन, शेख जब्बार यांच्यासह पत्रकारांनी दोन्ही मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com