Crop Damage : पाण्याअभावी केळी बागांनी टाकल्या माना; विहिरी पडल्या कोरड्या; मुदखेड तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

Mukhed Drought Demand, Crop Damage, Trigger-1 Issue : मुखेड तालुका दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीकनुकसान लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. ६१ हजार ६०० हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.
Dry wells and inadequate rainfall have affected irrigated banana crops in Mukhed taluka.

Dry wells and inadequate rainfall have affected irrigated banana crops in Mukhed taluka.

esakal

Updated on: 

मुदखेड, : दुष्काळाच्या निकषांमध्ये ‘ट्रिगर-१’ व ‘ट्रिगर-२’ या तांत्रिक प्रक्रियांना महत्त्व दिले जात असले, तरी मुदखेड तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मेंडका व डोणगाव येथील कोरड्या पडलेल्या विहिरींमुळे बागायती पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मेंडका येथील माधव बालाजी जांगिलवाड, बंडू सीताराम निखाते आणि डोणगाव येथील मधुकर दिगंबर हामंद यांनी लागवडीवर मोठा खर्च केला. परंतु, पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात कृषी पंपांना वीजपुरवठ्याची अडचण असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तळ हातावरील फोडाप्रमाणे जोपासलेली केळीची पिके अखेर दुष्काळी परिस्थितीमुळे नष्ट करण्याची नामुष्की आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com