

Grampanchayat election child murder case
sakal
मुखेड : ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या निकषासाठी अडसर ठरणाऱ्या तिसऱ्या अपत्यामुळे निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता पाहून पोटच्या सहा वर्षाच्या मुलीला तेलंगणातील बोधन (जि. निजामाबाद) जवळील कॅनालमध्ये फेकून खून केल्याची घटना केरूर (ता मुखेड) येथे उघडकीस आली. याबाबत बोधन पोलिसांनी शोध घेत शुक्रवारी (ता ३०) रात्री पांडुरंग कोंडामंगले या युवकास ताब्यात घेतले आहे. प्राची पांडुरंग कोंडामंगले (सहा वर्षे) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.