

Maharashtra ACB Action In Mukhed Land Records Office Peon Caught Taking 15000 Bribe With Official Involvement Revealed
sakal
नांदेड : शेतजमिनीच्या मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी (ता. दोन) रंगेहाथ पकडले. विवेकानंद पांडुरंग खुडे (वय ३५) असे ताब्यात घेतलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. या प्रकरणात कार्यालयातील निमतानदार सय्यद इम्रान सय्यद इक्बाल याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.