नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अडकली लालफितीत

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण खेड्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण जोड रस्त्याची कामे मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे थांबली होती. तर डिसेंबर २०२० मध्ये उघडण्यात आलेल्या निविदेवर अद्यापपर्यंत कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने व पुन्हा कोविड- १९ ची परिस्थिती गंभीर होत असताना आतातरी नांदेड जिल्ह्यातील विशेष: किनवट माहूर तालुक्यातील मंजूर रस्त्यांचे दर्जोन्नती व विशेष दुरुस्ती कामाचे कार्यारंभ आदेश निघेल काय यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

राज्यातील न जोडलेल्या  वाड्या- वस्त्या जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर होऊ न शकणाऱ्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी दुर्गम भागातील खेड्यांना मुख्य मार्गाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून केली जातात. सन मार्च २०२० मध्ये कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित झाल्याने रस्ते बांधकाम व दुरुस्तीची कामे थंडबस्त्यात पडली होती.नांदेड जिल्ह्यात त्यानंतर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये ई- टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रामुख्याने एशियन डेव्हलपमेंट बँके अर्थसाहायीत पाच कामे आणि एनएनडी ९० पॅकेज अंतर्गत एक तसेच विशेष दुरुस्ती अंतर्गत १४ रस्ते दुरुस्ती कामाची ई टेंडर प्रक्रिया राबवली गेली. 

शिवाय कार्यकारी अभियंता नांदेड, अधीक्षक अभियंता औरंगाबाद व मुख्य अभियंता पुणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या तीन कार्यालयाच्या समन्वयाने कार्यारंभ आदेश निर्गमित करायचे होते. परंतु खोडा कुठे पडला ते कळण्यास मार्ग नाही. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यारंभ आदेश करण्यासाठी कामाच्या फाईलवर वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढे सरकत नल्याची खात्री लायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एकंदरित या कामाच्या कार्यारंभ आदेश निघण्यासाठी होत असलेला उशीर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भागाच्या प्रतिष्ठेला कुठेतरी गालबोट लावून जात आहे. निविदा प्रक्रिया पार पडलेल्या रस्ते कामाचे कार्यारंभ संदर्भात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेण्याचे टाळले.

बांधकाम मंत्र्याच्या जिल्ह्यात नोकरशाही वरचढचा प्रत्यय

राज्य महामार्ग, जिल्हा अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने अधिकच पैसा मिळावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्यांच्याच जिल्ह्यात हेतूपुरस्पर कामे थांबून आहेत. निविदा प्रक्रिया राबविल्या नंतर कार्यारंभ आदेश काढण्यासाठी जाणीवपूर्वक होत असलेला उशीर नामदार चव्हाणांच्या दूरदृष्टी उद्देशाला हरताळ फासणारा आहे. आपले इस्पित साध्य करण्यासाठी नोकरशाही लेट लतीफीचा अवलंब करुन मूळ उद्देशाला बगल देत विकास कामे प्रभावित करतात यावरून सिद्ध होत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com