esakal | नांदेड शहरात या पंधरा ठिकाणी महापालिकेचे कोरोना तपासणी केंद्र; नाना- नानी पार्क केंद्र बंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या अहवालात शहरांमधील बाधितांची संख्या वाढत असल्याचा आकडा मोठा येत आहे.

नांदेड शहरात या पंधरा ठिकाणी महापालिकेचे कोरोना तपासणी केंद्र; नाना- नानी पार्क केंद्र बंद

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरांमध्ये गतीने वाढत असल्याने नाना- नानी पार्कमध्ये कोरोना तपासणी केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने हे केंद्र महापालिका प्रशासनाने बंद केले आहे. महापालिकेच्या १५ रुग्णालयात तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या अहवालात शहरांमधील बाधितांची संख्या वाढत असल्याचा आकडा मोठा येत आहे. सोमवारी जवळपास ७०० नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. संसर्ग शहरात वाढत असल्याने नाना- नानी पार्क येथील तपासणी केंद्रावर तपासणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा - नांदेड : वादग्रस्त रेल्वे ठेकेदार एस. के. वल्लीचे बील रोखण्यासाठी सीटूचे डीआरएम कार्यालयासमोर उपोषण

शहरात प्रभागनिहाय महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणी केंद्र १५ ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत. 

 • मनपा सांगवी दवाखाना : सांगवी (बु), गौतमनगर, माधवनगर, अंबानगर, सिद्धार्थनगर, आसरानगर, चैतन्यनगर, तरोडा बुद्रुक, दिपनगर, विश्वदीपनगर, उजवी बाजू पूर्णा रोड, तरोडा बुद्रुक गाव पर्यंत परिसर,
 • मनपा तरोडा दवाखाना : शिव रोडची डावी बाजू पूर्ण, तरोडा खुर्द गावापर्यंत, मालेगाव रोड, भावसार चौक, जैन मंदिर, आयोध्यानगरी, शिवरायनगर सुमेधनगर, गजानन मंदिर, छत्रपती चौक ते झेंडा चौक उजवी बाजू.
 • मनपा जंगमवाडी दवाखाना : लेबर कॉलनी, गणेशनगर, वामननगर, छत्रपती चौक ते मोर चौक वाडी डावी बाजू, फुले मार्केट उजवी बाजूपर्यंत. 
 • पोर्णिमानगर दवाखाना : भाग्यनगर, आनंदनगर, शारदानगर, शोभानगर ते एमजीएम कॉलेज, वर्कशॉप पाण्याची टाकी ते हॉटेल नागार्जुनापर्यंत डावी बाजू, उजवी बाजू शिवाजीनगर.
 • मनपा दवाखाना श्रीनगर : स्नेहनगर पोलिस कॉलनी, शिवाजीनगर, विसावानगर, गोकुळनगर, विष्णुनगर, मस्तानपुरा, पीरबुऱ्हाननगर, शाहुनगर, हमालपुरा.
 • मनपा विनायकनगर दवाखाना नवीन इमारत : दत्तनगर, विनायकनगर, सिंधी कॉलनी, वसंतनगर, मगनपुरा, नवामोंढा, खोब्रागडे नंबर नगर नंबर 1 व 2, अश्रफनगर, साठेचौक एरिया.
 • मनपा विनायक नगर दवाखाना : गंगानगर सोसायटी, पांडुरंगनगर, महेबुबनगर, गोविंदनगर, नंदीग्राम सोसायटी, शिवनगर, फारुखनगर, एलआयसी ऑफिसच्या पाठीमागील भाग.
 • श्रावस्तीनगर दवाखाना : फुले मार्केट ते काबरानगर पाण्याची टाकी डावी बाजू, समतानगर, विजयनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, डॉक्टर काब्दे हॉस्पिटल एरिया, जयभीम नगर, श्रावस्तीनगर पूर्ण भाग, लालवाडी.
 • मनपा खडकपुरा दवाखाना : खडकपुरा पूर्ण भाग, समीराबाग, देगावचाळ, विमाननगर, एसटी ऑफिसच्या पाठीमागील भाग ते सुगाव रोड मनपा हद्द. बोरबन मनपा शाळा, वजीराबाद, डॉक्टर लाइन, वजीराबाद दिलीप सिंग, गुरुद्वारा संपूर्ण भाग, गवळीपुरा टेकडी, गोवर्धन घाट, चिखलवाडी, गणराजनगर बाफना ते जुना मोंढा टावर उजवी बाजू, वेंकटेशनगर, आंबेडकर पुतळा संपूर्ण भाग.
 • मनपा हैदराबाद दवाखाना कापूस संशोधन केंद्राचे जुना पूल डावी बाजू पूर्ण हैदराबाद परिसर कॉलनीनगर हमेदिया कॉलनी, इस्लामपुरा, गाडेगाव रोड, उमर कॉलनी, देवीनगर.
 • मनपा आरबगल्ली दवाखाना : संपूर्ण इतवारा भाग, गाडीपुरा, लोहार गल्ली, शांतीनगर, शक्तीनगर, गणेश टॉकीज, बडी दर्गा, फत्तेबुरुज, शनी मंदिर परिसर, कपडा मार्केट पूर्ण.
 • मनपा कौठा दवाखाना :  जुना कौठा भाग, रवीनगर, नविन कौठा भाग, श्रीपादनगर, वसरणी, असर्जन, पद्मजा सिटी, नागार्जुना शाळा परिसर, लुटे मामा चा चौक पूर्ण परिसर, बिग बाजार पूर्ण भाग, लातूर फाटा कॅन्सर हॉस्पिटल भाग, भिमवाडी, रहिमपूर, ढवळे कॉर्नर, सिडको, हडको संपूर्ण भाग, असद्वान वाघाळा, शाहूनगर, राहुलनगर आणि संभाजी चौक पूर्ण एरिया.